पोलिसांचा सावळागोंधळ! 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला शांतता भंगाची नोटीस

पोलिसांचा सावळागोंधळ! 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला शांतता भंगाची नोटीस

पोलिसांनी (Police) नुकतचं एका मृत व्यक्तीला शांतता भंगाची (breach of peace) नोटीस (Notice) पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

हरदोई, 01 फेब्रुवारी: उत्तर प्रदेश पोलिसांनी एका मृत व्यक्तीला शांतता भंगाची नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पोलिसांनी काही जिवंत व्यक्तींसोबत एका मृत व्यक्तीलाही शांतता भंगाची नोटीस बजावली असून दंडाची रक्कम घेवून दंडाधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितलं आहे. यामध्ये पोलिसांनी 3 वर्षांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितलं आहे.

आगामी निवडणूका लक्षात घेवून ग्रामीण भागात शांतता कायम करण्यासाठी पोलीस अशाप्रकारची कारवाई करत असतात. पण यावेळी पोलिसांनी गावात झालेल्या किरकोळ वादावरून जिवंत व्यक्तींबरोबर एका मृत व्यक्तीलाही नोटीस बजावली आहे. शांतता भंगाच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला असून 50 हजार रुपयांची जमानत रक्कम घेवून दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितलं आहे. हा सावळा गोंधळ लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पोलिसांनी स्थानिक पोलिसांना या निष्काळजीपणा बद्दल जाब विचारला आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेशामधली हरदोई जिल्ह्यातील बघौली पोलीस ठाण्यातील आहे. या ठाण्यातील पोलिसांनी 3 वर्षांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीला नोटीस बजावली आहे. बघौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या नीभी गावातील राम आसरे नावाच्या व्यक्तीच्या नावे पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. शांतता भंग केल्यामुळे ही नोटीस न्यायालयाच्या नावे पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये  एकूण 9 जणांची नावं आहेत. ज्यामध्ये राम आसरे, नरेश, हरिश्चंद्र, रती सिंह, राघवेंद्र, सतीश, गुड्डू, लवकुश आणि अशोक यांचा समावेश आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हरिश्चंद्र यांचा 3 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. मात्र ही नोटीस पाहून मृत हरिश्चंद्राचे नातेवाईक आचंबित झाले आहे. यानंतर पोलिसांच्या गलथान कारभाराचं पितळं उघड पडलं आहे. याप्रकरणाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी निरिक्षकांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.

Published by: News18 Desk
First published: February 1, 2021, 4:21 PM IST

ताज्या बातम्या