मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मोठी बातमी, चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीय भाजप नेत्याच्या घरावर पोलिसांची धाड

मोठी बातमी, चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीय भाजप नेत्याच्या घरावर पोलिसांची धाड

 अवैध सावकरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवैध सावकरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवैध सावकरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर, 06 मार्च : पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणी आक्रमकपणे बाजू मांडणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव  यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे.

भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली आहे. अधटराव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांच्या कारवाईत अधवटराव यांच्या घराच्या झडतीमध्ये एकूण 48 चेक, 9 हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅकपासबुके सह रोख रक्कम 29 हजार 340 रूपये जप्त करण्यात आले आहे.  अधवटराव यांच्याविरोधात सावकराकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही कारवाई करण्यात आली आहे.

जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला बलात्कार प्रकरणातील आरोपी

खाजगी सावकार म्हणून विदूल अधटराव यांनी पैशाचे व्यवहार केले होते. अधवटराव यांच्यापाठोपाठ त्यांच्या इतर साथीदारांचीही पोलीस शोध घेत आहे. अवैध सावकरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.  त्यांच्या विरोधात  पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 135/2021 महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम 2014 चे कलम 39, 45 सह भा.दं.वि.कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदूल अधवटराव हे भाजपच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या विरूद्ध उपनिरीक्षक प्रशांत  भागवत, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, निता डोकडे यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

पूजा चव्हाण प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका मांडत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.  याच दरम्यान, चित्रा वाघ यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचे पती किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक, लॉकडाउन लागण्याची शक्यता

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किशोर वाघ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने (ACB) किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्यावर असा आरोप केला जात आहे की,  त्यांच्याकडे असणारे 90.24 टक्के संपत्ती ही बेहिशोबी आहे.

2016 मधील एका प्रकरणाच्या तपासादरम्यान ही माहिती उघड झाली होती. त्यामुळे किशोर वाघ यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. किशोर वाघ यांच्यावर कलम 13 (1) (इ), कलम 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध नियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी 3 लाख 46 हजार 663 रुपये अधिकची संपत्ती आढळून आली आहे. शिवाय विविध शहरात असणारी त्यांची मालमत्ता बेहिशोबी असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Crime news, Maharashtra, Pandharpur