नालासोपारा, 21 नोव्हेंबर : वसई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या 37 जणांना अटक केली आहे. तसंच याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरातील आप्पा नगर परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्यावर पोलिसांचा छापा मारला. यावेळी 90 हजारांची रोकड आणि टोकन असा लाखोंचा माल जप्त केला आहे. पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत. हा अनधिकृत जुगार अड्डा टोकन पद्धतीने चालविला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना मिळाली होती.
हेही वाचा- अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामा-भाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव, धक्कादायक घटनाया माहितीनंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, महादेव वेदपाठक, मंगेश चव्हाण, सागर बारावकर, रमेश अलदर, पि एन काळे यांच्या पथकाने सापळा रचून 37 आरोपींना अटक करून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट उडाली आहे.