मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Honor Killing: कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या, जळत्या चितेवरून पोलिसांनी उचलला मृतदेह

Honor Killing: कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या, जळत्या चितेवरून पोलिसांनी उचलला मृतदेह

आपल्या मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या तरुणीची तिच्या कुटुंबीयांनी हत्या करून (Police left dead body from burning pyre in honor killing case) तिला गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

आपल्या मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या तरुणीची तिच्या कुटुंबीयांनी हत्या करून (Police left dead body from burning pyre in honor killing case) तिला गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

आपल्या मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या तरुणीची तिच्या कुटुंबीयांनी हत्या करून (Police left dead body from burning pyre in honor killing case) तिला गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

फतेहाबाद, 1 डिसेंबर: आपल्या मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या तरुणीची तिच्या कुटुंबीयांनी हत्या करून (Police left dead body from burning pyre in honor killing case) तिला गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गुपचूप (Police got news from sources) जाळला जात असताना पोलिसांना खबर मिळाली आणि त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत जळत्या चितेवरून मृतदेह उचलून नेला.

अशी घडली घटना

हरियाणातील फतेहाबादमध्ये राहणाऱ्या अनुप आणि शिक्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. गेल्या वर्षी त्यांनी कुणालाही कल्पना न देता प्रेमविवाह केला होता. मात्र त्यानंतर करिअर सेट होईपर्यंत आपापल्या घरी राहण्याचा निर्णय़ घेतला होता. नुकतीच शिक्षाला चंदीगढमध्ये नोकरी लागली होती. त्यानंतर अनुपही चंदिगढला गेला आणि दोघं एकत्र राहू लागले. तीन दिवसांपूर्वीच शिक्षाच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी शिक्षाला धडा शिकवण्याचा कट रचला.

गोड बोलून बोलावलं घरी

शिक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असून तिचं आपण थाटामाटात लग्न लावून देऊ, असं सांगत तिच्या कुटुंबीयानी तिला घरी बोलावलं. मात्र घरी आल्याच्या दोन दिवसांनंतर तिचा खून करण्यात आला आणि तिचा मृतदेह गुपचूप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुणालाही कल्पना न देता तिच्यावर अंत्यसंस्कार करून सर्व पुरावे मिटवून टाकण्याचा तिच्या कुटुंबीयांचा डाव होता. मात्र पती अनुपला एकाने फोन करून घटनेची कल्पना दिली आणि शिक्षाचा खून झाल्याचं सांगितलं. हे ऐकून धक्का बसलेल्या अनुपनं पोलिसांना फोन केला आणि घटनेची कल्पना दिली.

हे वाचा- ओव्हरसाईज डेनिम जॅकेटवरून ट्रोल झाली दीपिका पादुकोण; किंमत ऐकून व्हाल थक्क

पोलिसांची स्मशानात एन्ट्री

पोलिसांनी फायर ब्रिगेडसह स्मशानात प्रवेश करत पेटती चिता विझवली आणि मृतदेह ताब्यात घेतला. अचानक धडकलेले पोलीस पाहून कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. मात्र जळत्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतरच गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया केली जाईल, असं म्हटलं आहे. या घटनेमुळे सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.

First published:

Tags: Crime, Death, Haryana, Police