पटना, 30 डिसेंबर: गुन्हा घडल्यानंतर (Crime) तातडीनं गुन्हेगाराला (Criminal) पकडण्याऐवजी पोलीस (Police) सीमेवरून वाद (Border dispute) घालत बसल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. एका चोरट्याने एका व्यक्तीच्या हातातून साडेपाच लाखांची (Stole 5.5 lakh) रक्कम घेऊन पोबारा केल्यानंतर ती व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचली, मात्र गुन्हेगाराला पकडण्याबाबत हालचाली करण्याऐवजी हा गुन्हा आपल्या हद्दीत कसा घडला नाही, हे सांगण्यातच पोलिसांनी सगळा वेळ खर्च केल्याचं दिसून आलं. नागरिकही हा तमाशा पाहण्यासाठी रस्त्यावर आले होते.
अशी घडली घटना
बिहारी राजधानी पटनामध्ये एका नागरिकाचे साडेपाच लाख रुपये चोरट्याने दिवसाढवळ्या लुटले. याची तक्रार नोंदवण्यासाठी ही व्यक्ती कदम कुआं पोलीस ठाण्यात पोहोचली. त्याला पोलिसांनी तिथून हाकललं आणि चोरी झालेला परिसर हा बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर ती व्यक्ती धावतपळत तिकडे गेली. तर तिथल्या पोलिसांनी त्याला पुन्हा पिटाळलं आणि कदम कुआं पोलीस ठाण्यात जायला सांगितलं. त्याने जेव्हा आपण तिकडूनच इकडे आलो आहोत, असं सांगितलं, तेव्हा अधिकाऱ्यांनी दुसऱ्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि दोन्ही ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सुरू झाली हमरीतुमरी
चोरी झालेलं ठिकाण नेमकं कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं, यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. काही वेळाने दोघेही तिथं उपस्थिती असणाऱ्या नागरिकांना बोलावून त्यांची साक्ष काढू लागले आणि त्यांची मतं विचारू लागले. त्यावरून हद्दीचा फैसला करू लागले. अखेर चोरी झाल्याचं ठिकाण हे बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचं सर्वांचं मत पडलं आणि अधिकाऱ्यांनी ते मान्य केलं.
हे वाचा- श्रीमंतीला वैतागला तरुण; कोट्यवधींचा मालक झाल्यानंतर म्हणे, 'नोकरीच बरी कारण...'
नागरिक वैतागले
पोलीस चोरांना पकडण्याचं सोडून हद्दीवरून भांडत बसल्यामुळे अनेक तासांचा वेळ वाया गेला. घटना घडल्या घडल्या पोलिसांनी हालचाल केली असती, तर कदाचित चोरट्याला पकडण्यात यश आलं असतं. मात्र पोलिसांच्या भांडणामुुळे चोराला पळून जायला वेळ मिळाल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं.पोलिसांच्या अशा वागण्यामुळे आता आपली सुरक्षा वाऱ्यावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाकी ली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.