मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तलावात आढळला तरुणीचा मृतदेह; बॉयफ्रेंडच्या इंटरनेट हिस्ट्रीमुळे झाला प्रकरणाचा खुलासा

तलावात आढळला तरुणीचा मृतदेह; बॉयफ्रेंडच्या इंटरनेट हिस्ट्रीमुळे झाला प्रकरणाचा खुलासा

एप्रिल महिन्यात ऐलीनं ब्रँडनला मेसेज करून सांगितलं, की कदाचित ती गरोदर आहे आणि तिनं घरी केलेल्या टेस्टचा रिपोर्टही त्याला पाठवला. मात्र, यानंतर तो ऐलीला गर्भपात करण्यास सांगू लागला.

एप्रिल महिन्यात ऐलीनं ब्रँडनला मेसेज करून सांगितलं, की कदाचित ती गरोदर आहे आणि तिनं घरी केलेल्या टेस्टचा रिपोर्टही त्याला पाठवला. मात्र, यानंतर तो ऐलीला गर्भपात करण्यास सांगू लागला.

एप्रिल महिन्यात ऐलीनं ब्रँडनला मेसेज करून सांगितलं, की कदाचित ती गरोदर आहे आणि तिनं घरी केलेल्या टेस्टचा रिपोर्टही त्याला पाठवला. मात्र, यानंतर तो ऐलीला गर्भपात करण्यास सांगू लागला.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : कोणतंही प्रेमाचं नात (Love Relationship) हे विश्वासावर टिकून असतं. मात्र, जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा हे नातंही संपतं. सध्या एका कपलची बातमी चांगलीच चर्चेत आहे. दोघांनी कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे आणि धोकाही आहे. हैराण करणारी बाब म्हणजे यात बॉयफ्रेंडनी आपल्याच गर्लफ्रेंडला धोका दिला आहे. तो आपल्याच गर्लफ्रेंडच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे (Boyfriend Kills Girlfriend). अमेरिकेतील ही घटना हैराण करणारी आहे.

अमेरिकेच्या ऑक्सफोर्ड शहरात २१ वर्षीय एलेक्जँड्रिया कोस्टियल हिची निर्घृण हत्या झाली. एलेक्जँड्रियाला तिचे मित्र ऐली म्हणत असे. ती यूनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपीमध्ये मार्केटिंगचं शिक्षण घेत होती. मिरर वेबसाईटच्या वृत्तानुसार, ऐलीचं ब्रँडन थीसफेल्ड याच्यावर कॉलेजमध्ये प्रेम जडलं. मात्र, ब्रँडन विचित्र स्वभावाचा व्यक्ती होता. काही वेळ तो ऐलीसोबत प्रेमाने बोलत असे तर काहीच वेळात तिच्यावर नाराज होत असे.

लग्नातच नवरीला उचलून त्यानं स्टेजवरून काढला पळ; VIDEO पाहून नेटकरी शॉक

यावर्षी एप्रिल महिन्यात ऐलीनं ब्रँडनला मेसेज करून सांगितलं, की कदाचित ती गरोदर आहे आणि तिनं घरी केलेल्या टेस्टचा रिपोर्टही त्याला पाठवला. मात्र, यानंतर तो ऐलीला गर्भपात करण्यास सांगू लागला. या गोष्टीवरुन दोघांमध्ये बराच काळ वाद झाला. मात्र ऐली गर्भपातासाठी तयार नव्हती. १९ जुलैला ऐली एका नाईट क्लबमध्ये गेली होती. तिथून ती निघालेली सीसीटीव्हीमध्येही कैद झालं. मात्र, दुसऱ्याच दिवशी एका तलावात तिचा मृतदेह आढळला. तिला आठ गोळ्या मारल्या गेल्या होत्या.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, असं समजलं की ब्रँडन गर्भपात करण्याच्या निर्णयावर ठाम होता आणि यावरुन ऐलीसोबत त्याचा वाद झालेला. याशिवाय सोशल मीडियावर ब्रँडनचा हातात बंदूक घेऊन क्लिक केलेला एक फोटोही पोलिसांना दिसला. इतकंच नाही तर इंटरनेट हिस्ट्रीमधून पोलिसांना हेदेखील समजलं , की ब्रँडननं बंदूकीचा सायलेंसर, गोळ्या आणि फेस मास्कबद्दल सर्च केलं होतं.

24 वर्षे वयात 3 लव्ह मॅरेज; बनली 7 मुलांची आई, यूट्यूबरनं सांगितली वेदनादायी कथा

ब्रँडननं नेटवर सीरियल किलरबद्दल सर्च केलं होतं आणि ते कशा पद्धतीनं मर्डर करतात हे पाहिलं होतं. हे सर्व पाहून पोलिसांना ब्रँडनवरच संशय आला. त्याची गाडीही त्या तलावाजवळ दिसली होती, जिथे त्यानं ऐलीला भेटायला बोलावलं होतं. त्याच्याकडून बंदूकही जप्त करण्यात आली. त्याच्यात त्याच गोळ्या होत्या, ज्या ऐलीच्या शरीरात आढळल्या. यानंतर सप्टेंबर महिन्यात ब्रँडननं आपला गुन्हा मान्य केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ऐलीचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर आला तेव्हा समजलं की गरोदरही नव्हती.

First published:

Tags: Crime, Murder news, Relationship