मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हुंडा न घेतल्याने गाजलेला इन्स्पेक्टर लाच घेताना अटक, दार तोडून फिल्मी स्टाईल कारवाई

हुंडा न घेतल्याने गाजलेला इन्स्पेक्टर लाच घेताना अटक, दार तोडून फिल्मी स्टाईल कारवाई

मेडिकल दुकानदाराकडून लाच घेणाऱ्या इन्स्पेक्टरला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. घराचं दार तोडून फिल्मी स्टाईलचं ही अटक करण्यात आली.

मेडिकल दुकानदाराकडून लाच घेणाऱ्या इन्स्पेक्टरला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. घराचं दार तोडून फिल्मी स्टाईलचं ही अटक करण्यात आली.

मेडिकल दुकानदाराकडून लाच घेणाऱ्या इन्स्पेक्टरला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. घराचं दार तोडून फिल्मी स्टाईलचं ही अटक करण्यात आली.

  • Published by:  desk news

जयपूर, 17 डिसेंबर : हुंडा (Dowry) न घेतल्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला इन्स्पेक्टर (Police Inspector) आता लाच घेताना (Bribe) रंगेहाथ (Red Handed) पकडला गेला आहे. पोलीस दलात अनेक अधिकारी लाच घेऊन काम करत असल्याचा अनुभव सर्वसामान्य जनतेला नेहमीच येत असतो. त्यात काही सन्माननीय अपवादही असतात, मात्र बहुतांश जनतेला पोलीस आणि लाचखोरी यांचा जवळचा संबंध असल्याचे अनुभव येत असतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून हा अनुभव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

मेडिकल दुकानदाराकडे लाच

राजस्थानमधील जयपूरमध्ये नारकोटिक्स विभागात इन्स्पेक्टर म्हणून काम करणाऱ्या अमन नावाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. एका मेडिकल दुकानदाराकडे त्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई न करण्याच्या बदल्यात ही रक्कम देऊ करावी, अशी मागणी या इन्स्पेक्टरने दुकानदाराकडे केली होती. त्यानंतर 2 लाखांवर मांडवली झाली होती आणि ही लाच स्विकारण्याचा दिवसही ठरला होता.

दुकानदाराने केली तक्रार

मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. इन्स्पेक्टर अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यावर लाचलुचपत विभागाने सापळा लावण्याची तयारी केली आणि इन्स्पेक्टरला पकडलं.

अशी केली अटक

इन्स्पेक्टर घटनेच्या दिवशी मेडिकल दुकानाच्या परिसरात आला आणि त्याने दोन लाख रुपये असणारी बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर कुटुंबीयांसोबत तो घराकडे गेला. तिथं कुटुंबीयांना गाडीतच बसवून ठेवलं आणि काही वेळ बाहेर फेरफटका मारून तो घरात गेला. त्याच्यावर पाळत ठेऊन असलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराचं दार ठोठावलं. त्यावर त्यानं दार उघडलं नाही. त्यामुळं अधिकाऱ्यांनी लाथ घालून दार तोडलं आणि घरात प्रवेश केला. इन्स्पेक्टर अमनला त्यांनी नोटांसह रंगेहाथ अटक केली.

हे वाचा- दिल्लीत गुंडाराज!  मोबाईल चोरांनी तरुणीला नेलं फरफटत, CCTV त कैद झाला VIDEO

सर्वदूर झाली बदनामी

दोन वर्षांपूर्वी लग्नात हुंडा नाकारून इन्स्पेक्टर अमन यांनी आदर्श निर्माण केला होता. मात्र आता लाच घेताना रंगेहाथ पकडलं गेल्यामुळं त्यांची इज्जत धुळीला मिळाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Police, Rajsthan