Home /News /crime /

पती-पत्नीच्या वादात पोलिसांची एन्ट्री; जागेवरच झाला तरुणाचा मृत्यू, परिसरात खळबळ

पती-पत्नीच्या वादात पोलिसांची एन्ट्री; जागेवरच झाला तरुणाचा मृत्यू, परिसरात खळबळ

तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

    लखनऊ, 17 डिसेंबर : मुरादाबाद (Uttar Pradesh news) पोलिसांवर एका तरुणाला जबर मारहाण करीत त्याची हत्या (Murder) केल्याचा आरोप आहे. तरुण शहरातील एका खासगी रुग्णालयात कंपाऊंडर होता. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्यात आणलं होतं. पोलिसांनी तरुणाला काठीने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. साधारण एका तासानंतर कुटुंबीयांना कळालं की, पोलीस कस्टडीमध्ये कपांऊडरचा (Police Killed) मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या कस्टडीत असताना मृत्यू झाल्यामुळे तरुणाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी हरिद्वार हायवेवर मृतदेह ठेवून चक्का जाम केला. यानंतर घटनास्थळी एसपी दाखल झाले. यांनी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचं आश्वासन देऊन तेथून मृतदेह उचलण्यास सांगितले. तरुणाच्या पत्नीच्या भावाने पोलिसांना बोलावलं होतं.. ही घटना भोजपूर पोलीस ठाणे हद्दीतील सेहल येथील आहे. येथे राहणारे भूपेंद्र पांडेय मुरादाबाद येथील विवेकानंद रुग्णालयात कंपाऊंडर होते. भूपेंद्रचं तीन वर्षांपूर्वी राजपूर जिल्ह्यातील साधना नावाच्या तरुणीसोबत विवाह झाला होता. गुरुवारी रात्री पती-पत्नीमध्ये काही कारणामुळे वाद झाला. साधनाने आपल्या भावाला याबद्दल सांगितलं. यानंतर भावाने पोलिसांना याबाबत सांगितलं. यानंतर काही वेळात 112 चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंपाऊंडरला मारत मारत गाडीत बसवलं. ते काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण करीत होते. अशाच अवस्थेत त्यांनी तरुणाला गाडीत टाकलं. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रयत्नही केला. पती-पत्नीमधील वाद ते सोडवतील. मात्र पोलिसांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. साधारण तासाभरानंतर आली मृत्यूची बातमी... दीपड पांडेय यांनी सांगितलं की, पोलिसांनी तरुणाला नेल्याच्या साधारण एका तासानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आली. त्याला तातडीने विवेकानंद रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर मारहाण करणारे आरोपी पोलिसांनी पळ काढला. संतापलेल्या नागरिकांनी रुग्णालयाच्या समोर हायवे जाम केला. या प्रकरणात आरोपी पोलिसांनी विचित्र असं स्पष्टीकरण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर आोपी पोलिसांनी सांगितलं की, भूपेंद्रने कस्टडीमध्ये स्वत:ला विषाचं इंजेक्शन दिलं. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलीस गायब झाले आहेत. हे ही वाचा-मैत्री, प्रेम, लग्न अन्; लग्नाच्या 8व्या महिन्यात तरुणाची आत्महत्या पत्नीच्या भाऊही हादरला... पोलीस कस्टडीत मृत्यू झालेला कंपाऊंडर भूपेंद्र पांडेय यांच्या बहिणीचा भाऊ प्रदीप यांनी सांगितलं की, लग्नानंतर बहिणीच्या सासरची मंडळी तिला मारहाण करीत होती. अनेकदा या प्रकरणात पंचायत बसवण्यात आली. मात्र तिच्या बहिणीला नियमित मारहाण केली जात होती. शुक्रवारी साधारण 8 वाजता बहिणीने रडत रडत फोन केला. आणि पतीने मारल्याचं सांगितलं. यानंतर बहिणीचा त्रास पाहून भावाने 112 वर कॉल करून पोलिसांना बोलावलं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Uttar pradesh news

    पुढील बातम्या