मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नववधूच्या खोलीत घुसले पोलीस, खोलीतलं सामान विस्कटलं आणि म्हणाले सॉरी!

नववधूच्या खोलीत घुसले पोलीस, खोलीतलं सामान विस्कटलं आणि म्हणाले सॉरी!

तिचं लग्न होऊन केवळ सातच दिवस झाले होते. ती सासरी आपल्या बेडरूममध्ये बसली असताना अचानक पोलिसांनी तिथं धाड घातली.

तिचं लग्न होऊन केवळ सातच दिवस झाले होते. ती सासरी आपल्या बेडरूममध्ये बसली असताना अचानक पोलिसांनी तिथं धाड घातली.

तिचं लग्न होऊन केवळ सातच दिवस झाले होते. ती सासरी आपल्या बेडरूममध्ये बसली असताना अचानक पोलिसांनी तिथं धाड घातली.

  • Published by:  desk news

पटना, 17 डिसेंबर: नुकतंच लग्न झालेल्या (Newly married) वधूच्या (Bride) खोलीत अचानक पोलीस (Police raid) शिरले, तिथल्या सर्व साहित्याची झडती (Search) घेतली आणि काहीच न सापडल्यामुळे केवळ सॉरी (Apologized) म्हणून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. घरात दारूच्या पेट्या (Liquor boxes) लपवून ठेवल्याच्या संशयातून पोलिसांनी ही धाड घातल्याचं सांगितलं जात आहे. नुकतंच लग्न झालेल्या घरात अचानक पोलिसांची धाड पडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. पोलीस आपल्या घरी नेमके का आले आहेत, हेदेखील कुणाला समजत नव्हतं.

पोलिसांना मिळाली टीप

बिहारच्या वैशाली भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाला एक टीप मिळाली होती. त्यानुसार नव्यानं लग्न झालेल्या कुटुंबाच्या घरात काही दारूच्या पेट्या आणण्यात आल्याचं त्यांना समजलं होतं. मात्र अशा प्रकारे धाड टाकण्यासाठी, तपास करण्यासाठी वॉरंट न घेताच पोलीस गेले. अचानक पोलीस घरात घुसल्याचं पाहून सर्वांनाच धक्का बसला.

नववधूच्या खोलीची तपासणी

पोलिसांनी घरातील सर्व खोल्यांमध्ये तपास केला. हे करताना दिसेल ती वस्तू त्यांनी खाली ओढली आणि घर अस्ताव्यस्त केलं. कुठेच काही न मिळाल्यामुळे ते नववधूच्या खोलीत शिरले. या कारवाईदरम्यान पोलिसांकडे ना वॉरंट होतं, ना सोबत महिला अधिकारी होती. कुटुंबीयांनी या बाबींना आक्षेप घेतला आहे. पोलिसच कायदेशीर निकष धाब्यावर बसवून गुंडांप्रमाणे घुसखोरी करत असतील, तर दाद कुणाकडे मागायची, असा सवाल सामान्य जनता विचार आहे.

हे वाचा-गोड सुरुवात! कतरिना कैफनं पती विकीसाठी बनवला शिरा, फोटो शेअर करत व्यक्त केला....

पोलीस म्हणाले सॉरी

पोलिसांच्या धाडीमुळे आपल्याला चक्कर आल्याची तक्रार घरमालकीण शीला देवी यांनी केली आहे. आपल्याला हृदयरोगाचा त्रास असून अचानक पडलेल्या धाडीमुळे आपल्या जिवाला धोका निर्माण झाला होता, असं त्यांनी म्हटलं आहे. तर शेजाऱ्यांनी या धाडीचा चुकीचा अर्थ घेण्याची शक्यता असल्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेवटी, धाड टाकूनही या घरात पोलिसांना काहीच सापडलं नाही. त्यामुळे केवळ सॉरी म्हणून पोलीस तिथून निघून गेले.

First published:

Tags: Crime, Police, Raid, Women