मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुणे: राष्ट्रपती पदकासाठी हवालदारानं पोलीस दलालाच गंडवलं; कांड वाचून बसेल धक्का

पुणे: राष्ट्रपती पदकासाठी हवालदारानं पोलीस दलालाच गंडवलं; कांड वाचून बसेल धक्का

Crime in Pune: पुणे शहर पोलीस दलात (Pune police) कार्यरत असताना अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या एका प्रसिद्ध पोलीस हवालदारानं राष्ट्रपती पदक (Presidential Medal) मिळवण्यासाठी पोलीस दलाचीच फसवणूक (proposed fake documents) केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 11 मार्च: पुणे शहर पोलीस दलात (Pune police) कार्यरत असताना अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या एका प्रसिद्ध पोलीस हवालदारानं राष्ट्रपती पदक (Presidential Medal) मिळवण्यासाठी पोलीस दलाचीच फसवणूक (proposed fake documents) केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं वरिष्ठांकडून झालेली कारवाई लपवत आणि सरकारी दस्तावेजात अफरातफर करत राष्ट्रपती पुरस्कार मिळवला होता. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे.

गणेश जगताप (Ganesh Jagtap) असं राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या पोलीस शिपायाचं नाव असून तो पुणे शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत आहे. आरोपीनं राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी आस्थापना विभागातल्या पोलिसांना हाताशी धरून सर्व्हिस बुक मध्ये खोट्या नोंदी केल्याचं उघड झालं आहे. राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी संबंधित पोलिसावर कोणाताही गुन्हा दाखल झालेला नसावा किंवा त्याच्यावर कोणतीही कार्यालयीन कारवाई झाली नसावी, अशी अट आहे.

हेही वाचा-पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच जवानाने ऑन ड्युटी झाडली स्वत:वर गोळी!

आरोपी गणेश जगताप यानं सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असताना त्याच्या बेकायदेशीर वर्तनाबद्दल त्याला वेतनवाढ रोखण्याच्या दोन शिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र गणेश जगताप यानं गोपनीय विभागात कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सेवापुस्तकात बदल करून खोट्या सह्या आणि बनावट सरकारी शिक्के तयार करून खोटे दस्त बनवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी गणेश जगताप याच्यासह नितेश आयनुर, रवींद्र बांदल आणि अशोक जगताप या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा-अवघ्या 5 दिवसात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; चिमुकलीचं अपहरण करणाऱ्याला कठोर शिक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार गणेश जगताप हा सध्या विशेष शाखेत नेमणूकीस आहे. 2017 ते 2020 या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना त्यानं हा सर्व प्रकार केला. स्वतःच्या फायद्यासाठी व राष्ट्रपती पोलीस पदक मिळवण्यासाठी गुन्हेगारी कट रचून व शासनाची फसवणूक करण्यासाठी त्यानं सेवापुस्तकातील नोंदीमध्ये अफरातफर करत बनावट दस्त तयार केला होता. त्यावर बनावट सह्या करत सरकारी शिक्क्यांचा गैरवापर देखील केला आहे. कर्तव्यात कुचराई केल्यामुळे आरोपीची दोन वर्षे वेतनवाढ रोखण्यात आली होती.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune