चाकू दाखवत होता दरोडेखोर, वाघासारखी झडप घालून पोलिसाने पकडले, LIVE VIDEO

चाकू दाखवत होता दरोडेखोर, वाघासारखी झडप घालून पोलिसाने पकडले, LIVE VIDEO

दोघांनीही दुचाकी तेथेच टाकून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. पण जांबियाच्या धाकामुळे पोलीस आणि नागरिक चोरांपर्यंत पोहोचू शकत नव्हते.

  • Share this:

बेळगाव, 07 डिसेंबर : बेळगाव (belgaum ) जिल्ह्यातल्या मच्छे गावाजवळ चोर-पोलिसांमधला थरार पहायला मिळाला. जांबिया काढून हल्ल्याची भीती दाखवणाऱ्या चोरट्याला न घाबरता त्याच्यावर झडप घालून वडगावमधील दोन निडर पोलीस कॉन्स्टेबलनी (Police constable) पकडले. या चोरांकडे धारदार शस्त्रही सापडल्याची माहिती आहे.

प्रकाश पाटील आणि साई मंडल हे दोघेही गोव्यातील चोरटे आहेत. बेळगाव खानापूर महामार्गावर झाड शहापूर येथे महामार्गाला लागूनच ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मल्लाप्पा गोरल यांचे घर आहे. रविवारी दुपारी हे घर बंद पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. सोन्याचे दागिने चोरले आणि तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच शेजारच्या मुलीने त्यांना पाहिले. तिने आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांनी मागील दरवाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी काही कामानिमित्त वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल योगेश आणि चन्नाप्पा आणि दोघे दुचाकीवरून जात होते.

शेजाऱ्यांनी हे दोघे चोर असून दरोडा टाकून पळून चालले आहे, अशी माहिती त्यांना दिली. त्यानंतर  दोघांनीही दुचाकी तेथेच टाकून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. पण जांबियाच्या धाकामुळे पोलीस आणि नागरिक चोरांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. पण अखेर कॉन्स्टेबल योगेश यांनी चोरट्यांची नजर चुकवून त्याच्यावर पाठीमागून झडप मारली आणि त्याला खाली पाडले.

चोरटा खाली पडल्यानंतर चन्नाप्पा यांनी त्याच्या हातातील धारधार शस्त्र हिसकावून घेतले. त्यानंतर तिथे जमलेल्या नागरिकांनी या चोरट्याला चांगलाच चोप दिला.

अखेर अर्धा तासाच्या या थरार नाट्यानंतर नागरिकांच्या मदतीने चोरटे जेरबंद झाले. योगेश आणि चन्नाप्पा या दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन यांनीही त्या पोलिसांना बक्षीस देऊ केले आहे. तर दोन्ही चोरांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 7, 2020, 12:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या