मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोलीस हवालदाराची राहत्या घराच्या वरांड्यात गळफास, गोंदियातील धक्कादायक घटना

पोलीस हवालदाराची राहत्या घराच्या वरांड्यात गळफास, गोंदियातील धक्कादायक घटना

गोंदिया जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घराच्या वरांड्यात स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Chetan Patil

रवी सपाटे, गोंदिया, 27 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घराच्या वरांड्यात स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे घडली आहे. महेश भुरे असे मृतकाचे नाव असून ते देवरी पोलीस उप मुख्यालयात कार्यरत होते. संबंधित घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता महत्त्वाची माहिती समोर आली. पोलीस हवालदार महेश भुरे हे गेल्या तीन वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना असह्य त्रास सोसावा लागत होता. अखेर हा त्रास सोसावत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. महेश भुरे यांनी आजारपणामुळे नैराश्यात जावून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

(घरात आढळले एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड)

संबंधित घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे घडली आहे. महेश भुरे असं मृतकाचं नाव असून ते देवरी पोलीस उप मुख्यालयात कार्यरत होते. ही घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

पोलीस हवालदार महेश भुरे हे 2020 पासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. आजाराच्या सततच्या वेदना त्यांना असह्य होत असल्याने त्यांनी काल रात्री देवरी येथे राहत असलेल्या घरातील वरांड्यात गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी देवरी पोलीस तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime, Suicide