पिंपरी चिंचवड, 11 जानेवारी : ज्येष्ठ लेखक आणि 'हिंदु'कार भालचंद्र नेमाडे (bhalchandra nemade)यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' (hindu jagnyachi samruddha adgal) या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांबद्दल दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रमेश खेमू राठोड यांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
Bollywood Drug Case: मुच्छड पानवालाला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स
'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' या पुस्तकामध्ये लमान समाजाच्या महिला हडप्पा काळापासून पुढे वेश्या व्यवसाय करत असे या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांचे हे विधान जाती समाज यांच्या द्वेषाची भावना निर्माण करणार आहे, असा आरोप अॅडव्होकेट रमेश राठोड यांनी केला आहे.
रमेश राठोड यांच्या तक्रारीनंतर भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात कलम 500, 505 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बर्ड फ्लूमुळे परभणी हाय अलर्टवर, संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार!
तसंच, भालचंद्र नेमाडे यांनी लमाण समाजाबद्दल पुरावे द्यावे नाहीतर पुस्तक मागे घ्यावे, अशी मागणीही तक्रारदार रमेश राठोड यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.