Home /News /crime /

ढोंगी ज्योतिष्याचा पर्दाफाश, नोकरीच्या अमिषाने तरुणीची फसवणूक, लगट करण्याचा प्रयत्न आला अंगाशी

ढोंगी ज्योतिष्याचा पर्दाफाश, नोकरीच्या अमिषाने तरुणीची फसवणूक, लगट करण्याचा प्रयत्न आला अंगाशी

चांगल्या पगाराचा शब्द देऊन नोकरीवर ठेवलेल्या एका तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न सुरेंद्र कुमार गुप्ता नावाच्या ज्योतिष्याच्या चांगलाच अंगलट आला.

    जयपूर, 2 जुलै : चांगल्या पगाराचा शब्द देऊन नोकरीवर ठेवलेल्या एका तरुणीशी लगट (Molestation) करण्याचा प्रयत्न सुरेंद्र कुमार गुप्ता (Surendra Kumar Gupta) नावाच्या ज्योतिष्याच्या चांगलाच अंगलट आला. आपल्या कार्यालयात नोकरी करणाऱ्या तरुणीसमोर एक दिवस हा ढोंगी ज्योतिषी अर्धनग्न अवस्थेत येऊन उभा राहिला आणि तिच्याशी लैंगिक संबंध (Sexual relations) ठेवण्याची मागणी करू लागला. म्हणे, ही तर प्रभूची इच्छॉ आपल्याला दैवी साक्षात्कार झाला असून वरूनच शारीरिक संबंधांचे आदेश देण्यात आल्याचा दावा करत हा ज्योतिषी तरुणीसमोर येऊन उभा राहिला. आपल्यापासून तुला एक मुलगा होईल, हा मुलगा देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवेल आणि तुझ्या आयुष्यात सुख, समाधान आणि संपत्ती घेऊन येईल, असं सांगत त्या तरुणीवर बळजबरी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. तरुणीनं कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि थेट पोलीस ठाणं गाठत या ढोंगी ज्योतिषाची तक्रार नोंदवली. अशी झाली ओळख ही तरुणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत नोकरी करत होती. याच दरम्यान फेसबुकवरून तिची या ज्योतिष्याशी ओळख झाली. आपली जयपूरमध्ये एक एनजीओ असून ती चालवण्यासाठी आपल्याला एका सहकाऱ्याची गरज असल्याचं त्यानं सांगितलं. आपण दरमहा 50 हजार रुपये मानधन द्यायला तयार आहोत, असं सांगून त्यानं तिला नोकरीसाठी जयपूरला येण्याचं आवाहन केलं. ती तरूणी त्याच्यावर विश्वास ठेऊन मुंबई सोडून जयपूरला गेली. हे वाचा -अडीच वर्षांनी मिळाला न्याय; नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 20 वर्षे कारावास काही महिने त्याच्यासोबत काम करूनही तो पगार देत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. या ज्योतिष्यानं एकदाही पगार दिला नसल्याचं तरुणीनं सांगितलं आहे. हळूहळू त्याची लगट वाढत असल्याचं तिच्या लक्षात येत होतं. या ज्योतिष्यापासून आपली कशी सुटका करून घ्यावी आणि थकलेला पगार कसा मिळवावा, या विचारात ही तरूणी असताना एक दिवस त्यानं थेट अर्धनग्न अवस्थेत तिच्यासमोर येत तिच्याकडून शारीरिक संबंधांची मागणी केली. त्यानंतर मात्र त्याच्या भोंदुपणाविषयी तरुणीची खात्री पटली आणि तिनं तिथून पळ काढला. त्यानंतर ज्योतिषी सुरेंद्र कुमार गुप्तानं तरुणीच्या घरी फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला तसंच तुमची मुलगी अनेकजणांसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचं सांगितलं. पोलीस याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Rajasthan

    पुढील बातम्या