मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ठणठणीत तरुण पोलीस ठाण्यात आला आणि 24 तासांत गेला जीव, कुटुंबीयांचा आक्रोश

ठणठणीत तरुण पोलीस ठाण्यात आला आणि 24 तासांत गेला जीव, कुटुंबीयांचा आक्रोश

अटक केल्यानंतर पोलिसांनी (Police beaten youth to death blames his family) केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

  • Published by:  desk news

कानपूर, 16 नोव्हेंबर: अटक केल्यानंतर पोलिसांनी (Police beaten youth to death blames his family) केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीवर (Question on police working style) प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे वळ आपल्या भावाच्या अंगावर दिसत होते, असा दावा मृत तरुणाच्या बहिणीनं केला आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरातील कल्लू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. त्या रात्री तरुणाला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कुटुंबीयांना फोन आला आणि तरुणाला घेऊन जायला सांगण्यात आलं त्याची तब्येत बरी नसून त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी कुटुंबीयांना दिला.

हॉस्पिटलमध्ये नेताना झाला मृत्यू

कुटुंबीय कल्लूला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. कल्लूच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. तो प्रचंड कण्हत होता आणि वेदना सहन करत होता. अखेर वेदना सहन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती तिने दिली आहे.

पोलिसांवर आरोप

कल्लूचा मृत्यू हा पोलिसांनी केलेला खून असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. कल्लूला पोलीस घेऊन गेले त्यावेळी त्याची तब्येत एकदम ठिक होती. असं असताना 24 तासांत असं काय घडलं की वेदनांनी तडफडत त्याचा मृत्यू व्हावा, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

हे वाचा- नोकरी सोडून जोडप्यानं विकत घेतली नाव, सुरु आहे जगाची भ्रमंती

सपाचा पुढाकार

या प्रकरणात समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर अद्याप कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रारच दाखल केली नसल्याची माहिती मिळत आहे.

First published:

Tags: Crime news, Death, Uttar pardesh