प्रेम संबंधातून झालं मुल, प्रेयसीला धोका देत तरुणाने बाळचं पुरलं; अखेर CCTVमुळे फुटलं बिंग

प्रेम संबंधातून झालं मुल, प्रेयसीला धोका देत तरुणाने बाळचं पुरलं; अखेर CCTVमुळे फुटलं बिंग

अरबाज बागवान याचे 21 वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा-बायको असल्याचे भासवून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली होती.

  • Share this:

पुणे 31 ऑक्टोबर: पुरंदर तालुक्यातील अंबोडी येथे तीन दिवसापूर्वी एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून झालेल्या मुलाला पुरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) तीन दिवसात प्रकरणाचा छडा लावला असून दोघांना अटक करण्यात यश मिळवलं आहे. CCTVमुळे त्या नराधम बापाचं बिंग फुटलं आहे.

पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 28 ऑक्टोबरला तालुक्यातील अंबोडी येथे वनविभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्ती आढळून आल्या होत्या. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर या व्यक्तींनी तेथून पोबारा केला होता.

या घटनेतील आरोपींची पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा पुरावे नव्हते. मात्र यानंतर सुद्धा सी.सी.टीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सासवड येथे राहणारे अरबाज इक्बाल बागवान व अनिकेत संपत इंगवले या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पैसे नव्हते खर्चाला म्हणून शेजाऱ्याचे फोडले घरं, अडीच लाखांचे दागिने पळवले, पण..

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरबाज बागवान याचे 21 वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा-बायको असल्याचे भासवून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली. यानंतर हे बाळ मी सांभाळतो असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाज याने ताब्यात घेतले. यानंतर त्याचा मित्र अनिकेत इंगोले त्याच्याबरोबर आंबोडी येथील शेतात जाऊन हे बाळ पुरण्याचा प्रयत्न केला.

मात्र शेतकऱ्यांनी पाहिल्याने हा प्रयत्न फसला. याबाबत सासवड पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने पुरंदर तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास तातडीने लागावा म्हणून पोलिसांवर मोठा दबावही होता.

BIGG BOSS: 'वडिलांनी माझ्यासाठी काही केलं तर..' सल्लूमियाँची वादात उडी

सासवड पोलिसांनी 48 तासात या घटनेचा छडा लावून आरोपीला ताब्यात घेतलं या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, महेश खरात, महेश उगले, राजेश खर्चे यांच्या टिमने ही कामगिरी केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 31, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या