मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पतीने चोरीची तक्रार दाखल केली अन् पोलिसांनी केलं पत्नीला अटक; प्रकरण समोर येताच बसला मोठा धक्का

पतीने चोरीची तक्रार दाखल केली अन् पोलिसांनी केलं पत्नीला अटक; प्रकरण समोर येताच बसला मोठा धक्का

चोरी प्रकरणात आरोपीला अटक

चोरी प्रकरणात आरोपीला अटक

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र आता या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या पत्नीलाच अटक केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 मार्च :  मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने आपल्या पहिल्या पतीसोबत संगनमत करून आपल्याच घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे. पायल शेडगे असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणात या महिलेला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. मालाड परिसरात राहणाऱ्या ज्योतिराम शेडगे यांच्या घरी गेल्या वर्षी चोरी झाली होती. मात्र या चोरी प्रकरणात आपल्याच बायकोला अटक होईल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं, या प्रकारानं ज्योतिराम शेडगे यांना चांगलाच धक्का बसला आहे.

  रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी ज्योतिराम शेडगे हे त्यांची पत्नी पायलसोबत एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सांगलीला गेले होते. मात्र जेव्हा ते कार्यक्रमावरून परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचं आढळून आलं होतं. चोरांनी त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेले रोख चार लाख सत्तार हजार रुपये आणि सोन्या-चांदीची बॅग लांबवली होती. या प्रकरणी ज्योतिराम शेडगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पत्नीवर संशय 

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र त्यांच्या घराजवळ कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं व चोरीचा दुसरा कोणताच पुरावा मिळत नसल्यानं या प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक बनला होता. मात्र पोलिसांना या कापाटात ज्योतिराम शेडगे यांच्या पत्नीच्या बोटाचे ठस्से आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय त्यांच्या पत्नीवरच होता.

होळीनिमीत्त एका मोबाईलवर दारूच्या दोन बाटल्या फ्री, ऑफर दिली अन् जेलमध्ये गेला

आरोपीला अटक 

पोलिसांनी वारंवार चौकशी केल्यानंतर अखेर पायल शेडगेने गुन्ह्याची कबुली दिली. तिने आपल्या पहिल्या पतीसोबत मिळून हा चोरीचा कट रचला होता. सांगलीला जाण्यापूर्वी ज्योतिराम हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी साधून तिने आपल्या पहिल्या पतीला घरी बोलावले आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम व दागिने त्याला देऊन टाकले. त्यानंतर ही चोरी वाटावी यासाठी तिने कपाटातील सामान अस्तव्यस्त करून ठेवले. मात्र अखेर या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Mumbai News