मुलाला होता आईच्या प्रेमसंबंधाचा संशय, 3 जणांना सुपारी देऊन सांगितलं मारून टाका!

मुलाला होता आईच्या प्रेमसंबंधाचा संशय, 3 जणांना सुपारी देऊन सांगितलं मारून टाका!

आईचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मुलगा अंश सतत आईशी वाद घालायचा. त्याला त्याच्या आईचा प्रचंड राग यायचा आणि याच रागातून त्याने आईला जीवे मारण्याची सुपारी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : पोलिसांनी एका युवकाला आपल्या आईच्या हत्येचा सापळा रचल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं आहे. स्वत:च्या जन्मदात्या आईची हत्या करण्यासाठी मुलाने तीन अल्पवयीन मुलांसह आणखी तीन लोकांना सुपारी दिली होती. गुरुवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय अंश ढींगरा याने राजेंद्र आणि राहुल यांना घरात चोरी करून आपल्या आईची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी अंशचे त्याच्या आईशी वारंवार वाद व्हायचे. तर आपल्या आईचे बाहेर कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय अंशला होता आणि त्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आईचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मुलगा अंश सतत आईशी वाद घालायचा. त्याला त्याच्या आईचा प्रचंड राग यायचा आणि याच रागातून त्याने आईला जीवे मारण्याची सुपारी दिली.

आईला मारण्यासाठी 3 अल्पवयीन मुलांना दिली सुपारी

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबरला तीन जणांनी अंशच्या घरात प्रवेश केला आणि घर लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्ये येणाऱ्या आईला त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, महिलेच्या मुलाने आईला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ढींगरा याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुंबईत एका पोलिसांकडून बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इतर बातम्या - Paytm यूजर्सला मोठा झटका! बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांचं होणार नुकसान

चेंबूर पोलीस ठाण्यात एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने गेली 12 वर्ष आपल्यावर एक पोलीस अधिकारी जबरदस्तीने बलात्कार करत होता अशी तक्रार करण्यात आली. त्याच बरोबर त्याने आपला वारंवार गर्भपात केला असल्याची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत जवाब नोंदवत त्या पोलीस अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इतर बातम्या -

इतर बातम्या - निवडणुकीला 10 दिवस असताना काँग्रेसला मोठा धक्का, या दिग्गजांनी धरला भाजपचा हात!

2003 साली व्हिजा वाढवून देण्याच्या बहाण्याने अनिल जाधव या पोलीस अधिकाऱ्याची आपल्याशी ओळख झाली. काम करून देण्याचा बहाण्याने गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला असं पीडित महिलेने तक्रारीमध्ये लिहलं आहे. इतकंच नाही तर आरोपी पोलिसाने त्याच्या मुलाला आणि मलादेखील मारण्याचा प्रयत्न केल्याचं तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

इतर बातम्या - आज महाराष्ट्रात राजकीय सभांचा धडाका, पाहा तुमच्या शहरात आहे कोणाची सभा?

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी जाधव याने एका तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून आपल्या समक्ष केला असून त्याला पुण्यात एका ठिकाणी गाडले असल्याची माहितीही पीडित महिलेने दिली आहे. तर आरोपी अनिल जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा पती असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तिचे वकील नितीन सातपुते यांनी या अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

इतर बातम्या - 'बॉडी कशी बनते हे कोणलाही सांगू नका', हृतिकचा VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading