भोपाळ, 18 ऑक्टोबर : एटीएममधील तांत्रिक बिघाडांचा गैरफायदा घेत 100 वेळा चोरी करून 10 लाख रुपये लुटणाऱ्या (Police arrested gang of ATM thieves) टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून चोरीचं (Technic of ATM theft) अनोखं तंत्र त्यांनी शोधून काढलं होतं. देशातील वेगवेगळ्या शहरांतील एटीएम हेरून त्यातून पैसे लंपास करणाऱ्या या टोळीचा माग काढणं पोलिसांसाठी (Challenge for police) मोठं आव्हान बनलं होतं. मात्र अखेर पोलिसांनी या चोरट्यांना शोधून त्यांना गजाआड करण्यात यश मिळवलं.
अशी करायचे चोरी
मूळचे हरियाणाचे असणारे हे चोरटे दिल्लीमार्गे भोपाळला येत असत. तिथल्या विशिष्ट प्रकारच्या एटीएमचा शोध घेत असत. हरियणातील पलवल गावचे शाहरूख, आरिफ आणि मनीष अशी त्यांची नावं. रेल्वे स्टेशनवर त्यांच्यासाठी एक बाईक तयार असे. त्या बाईकवरून चोरटे ठरलेल्या एटीएमपाशी जात. त्यानंतर शाहरूख एटीएममध्ये जात असे. मनीष एटीएमच्या बाहेर उभा राहून लोकांवर नजर ठेवत असे, तर आरिफ बाईकवर बसून पळण्यासाठी तयार राहत असे. चोरी केल्यानंतर ते तातडीनं बाईकवर बसत आणि स्टेशनला जात. स्टेशनच्या बाहेर बाईक लावून ते पळून जात असत आणि त्यानंतर काही वेळानं रेल्वेतून पुन्हा आपल्या गावी जात असत.
यूट्यूबवरून चोरीचं शिक्षण
एटीएममधून चोरी कशी करावी, याचं तंत्र ते यूट्यूबवरील एका व्हिडिओतून शिकले होते. त्यांनी एक लोखंडी आकडा बनवून घेतला होता. काही विशिष्ट प्रकारच्या जुन्या एटीएम केंद्रावरच त्याचा वापर होत असे. सुरुवातीला आपलं एटीएम कार्ड वापरून ते 500 रुपये काढायचे. जेव्हा एटीएममधून पैसे बाहेर येत, त्याच क्षणी आकडा पैसे बाहेर पडण्याच्या जागी अडकवायचे. त्यानंतर या आकड्यात जेवढे पैसे अडकतील, तेवढे घेऊन तिथून पोबारा करायचे. आतापर्यंत त्यांनी 100 वेळा अशी चोरी केली, त्यापैकी 35 वेळा त्यात यश मिळालं. त्यातून त्यांनी आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम लंपास केली होती.
हे वाचा- LPG Subsidy! केवळ गरीबांनाच अनुदान देण्याचा मोदी सरकारचा विचार
पोलिसांनी घेतला शोध
पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावलेल्या बाईकवरून शोध घेत या तिघांचा शोध लावला. तिघांपैकी शाहरूख हा 12 वी पास असून आरिफ 10 वी पर्यंत तर मनीष फक्त 8 वी पर्यंत शिकलेला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Crime, Madhya pradesh