Crime: सुशांतच्या भावाला गोळी मारणारे आरोपी अटकेत, मिळाली होती सुपारी

Crime: सुशांतच्या भावाला गोळी मारणारे आरोपी अटकेत, मिळाली होती सुपारी

बिहारच्या सहरसा येथे सुशांतसिंग राजपूतचा भाऊ आणि मधेपुरा येथील यामाहा मोटरसायकल शोरूमचे (Yamha Show Room) मालक राजकुमार सिंग यांच्यावर हल्ला झाला. याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 15 फेब्रुवारी : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या भावाला गोळ्या घालणाऱ्या आरोपींला पोलिसांनी अटक केली आहे. 30 जानेवारी रोजी बिहारच्या सहरसा येथे सुशांतसिंग राजपूतचा भाऊ आणि मधेपुरा येथील यामाहा मोटरसायकल शोरूमचे (Yamha Show Room) मालक राजकुमार सिंग यांच्यावर हल्ला झाला. बैजनाथपूर चौकाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या गुन्हेगारांनी दोघांना गोळ्या घालून जखमी केलं होतं.

सहारसाचे एसपी लिप्पी सिंग यांनी सांगितलं, की ही घटना जमिनीच्या विवादावरून  झाली आहे. यामाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंगचा छोटा भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक उमेश दालान यांच्यात पूर्वीपासूनच जमिनीवरून वाद सुरू आहेत. याच कारणावरून उमेश दालाननं विकी चौबे नावाच्या एका व्यक्तीला भावाला मारण्याची 5 लाखाची सुपारी दिली होती.

30 जानेवारीला आरोपींनी राजकुमार सिंग आणि त्यांच्या एका कर्मचाऱ्यावर अचानक हल्ला केला. गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळीबारात त्यांनी जखमी केलं. राजकुमार आणि त्याचा कर्मचारी घरातून शोरूमच्या मार्गाने जात असताना दोघांवर गोळीबार करण्यात आला होता, अशी माहिती राजकुमार सिंहने दिली होती. दुचाकीवर स्वार असलेल्या इसमांनी हेलमेट घातल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नसल्याचं राजकुमारनं पोलिसांना सांगितलं होतं.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी एसआयटी टीम गठीत केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता आरोपींबद्दलची माहिती मिळाली. फोन लोकेशनवरून आरोपींच्या अड्ड्याचा पत्ता लागला. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत बिंदेश्वरी यादव नावाच्या कुख्यात गुन्हेगारासह 5 जणांना अटक केली. या आरोपींना याआधीही अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: February 15, 2021, 8:43 AM IST

ताज्या बातम्या