मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल, मग...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल, मग...

बलात्कार पीडितेच्या तक्रारीनंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोबतच पीडितेचा चेहरा दाखवत व्हिडीओ व्हायरल (Video Viral)करणाऱ्या तिघांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

गोरखपूर ०४ मार्च : गोरखपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी (Sexual Harassment) हवालदार आणि चौकीदाराला निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोबतच पीडितेचा चेहरा दाखवत या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करणाऱ्या तिघांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोरखनाथ ठाण्याच्या क्षेत्रात राहाणारी ही अल्पवयीन मुलगी आर्केस्ट्रामध्ये काम करायची. पीडिता पादरी बाजार क्षेत्रातून रात्री साडेदहा वाजताच्या आसपास आपल्या घरी निघाली होती. तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणीही होत्या, मात्र त्या तिला बोलियां कॉलनीजवळ सोडून निघून गेल्या. यानंतर पीडिता एकटीच आपल्या घराकडे निघाली. इतक्यात काही दुचाकीस्वार तिथे आले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

मुलीनं या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं, की एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीआईजी जोगिंदर कुमार यांनी पोलीस अधिक्षक आणि महिला पोलिसाला घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवलं. सोबतच पीडितेची तक्रारही नोंदवून घेतली. पीडितेच्या तक्रारीनंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं, की पीडितेचं मेडिकल परीक्षण करून लवकरच पुढील कारवाई केली जाईल.

याशिवाय मुलीला चौकीत घेऊन जाणाऱ्या तिघांवरही कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. कारण या तिन्ही व्यक्तींनी मुलीचा चेहरा दिसत असतानाही तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडितेचा चेहरा किंवा तिची ओळख स्पष्ट करणं हा गुन्हा असल्यानं या तिघांविरोधात कारवाईचे निर्देश दिले गेले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Rape, Rape on minor, Sexual assault, Sexual harassment, Shocking news