मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /फोटो पाहून तरुणाने केलं लग्न; चेहऱ्यावरील ओढणी हटवताच हादरला, नवरीची थेट तुरुंगात रवानगी

फोटो पाहून तरुणाने केलं लग्न; चेहऱ्यावरील ओढणी हटवताच हादरला, नवरीची थेट तुरुंगात रवानगी

विवारी सकाळी आजूबाजूच्या महिला पीडित तरुणाच्या घरी आल्या आणि फोटो काढू लागल्या, त्यानंतर समजलं की लग्नाआधी ज्या तरुणीचा फोटो दाखवला गेला होता, ती तरुणी आणि लग्न करून घरी आलेली नवरी वेगवेगळ्या आहेत

विवारी सकाळी आजूबाजूच्या महिला पीडित तरुणाच्या घरी आल्या आणि फोटो काढू लागल्या, त्यानंतर समजलं की लग्नाआधी ज्या तरुणीचा फोटो दाखवला गेला होता, ती तरुणी आणि लग्न करून घरी आलेली नवरी वेगवेगळ्या आहेत

विवारी सकाळी आजूबाजूच्या महिला पीडित तरुणाच्या घरी आल्या आणि फोटो काढू लागल्या, त्यानंतर समजलं की लग्नाआधी ज्या तरुणीचा फोटो दाखवला गेला होता, ती तरुणी आणि लग्न करून घरी आलेली नवरी वेगवेगळ्या आहेत

नवी दिल्ली 30 मे : सध्या देशभरात लग्नाचा सीझन (Wedding Season) सुरू आहे. यादरम्यान लग्नसमारंभात घडलेल्या अनेक घटना सतत समोर येत राहतात. यातील काही घटना हैराण करणाऱ्या असतात. सध्या अशीच एक घटना राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातील सांचोर येथील सरवाना पोलिसांना बनावट लग्न करून नवरदेवाला लुटणाऱ्या वधूला अटक करण्यात यश आलं आहे (Matrimonial Fraud). सीआय किश्नाराम यांनी सांगितलं की, दांतिया येथील रहिवासी 30 वर्षीय सोहन सिंग राजपूत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार होती.

पतीला न सांगताच पत्नीचं दुसरं लग्न; नवऱ्याचं पोलिसात धाव घेत उपोषण

तक्रारीत सांगितलेलं की मुराद खानने त्याचा मित्र गणपत सिंग चौहान याची मेहुणी कीर्ती सिंहच्या मुलीशी लग्न लावून देऊ असं सोहनला सांगितलं. त्याने म्हटलं की यासाठी ५ लाख रूपये द्यावे लागतील. यानंतर पीडित आणि त्याच्या कुटुंबीयांना 20 वर्षीय मुलीचा फोटो दाखवला गेला. यानंतर पीडित तरुण या जाळ्यात अडकला आणि घरच्यांसोबत बोलून त्याने हे लग्न ठरवलं.

त्यानंतर 26 मे रोजी मुराद खानने पीडित तरुणाला सांगितलं की, गणपत सिंगच्या घरी कोणीतरी मरण पावलं आहे. अशा स्थितीत चार-पाच जणच येऊन मुलीचं लग्न लावून देतील. यानंतर पीडित तरुणासह काही लोक डीसा येथील गणपत सिंह यांच्या घरी पोहोचले. तिथे पैसे आणि दागिने घेऊन त्याचं लग्न लावून देण्यात आलं. रविवारी सकाळी आजूबाजूच्या महिला पीडित तरुणाच्या घरी आल्या आणि फोटो काढू लागल्या, त्यानंतर समजलं की लग्नाआधी ज्या तरुणीचा फोटो दाखवला गेला होता, ती तरुणी आणि लग्न करून घरी आलेली नवरी वेगवेगळ्या आहेत. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता या बनावट नवरीने सगळा खुलासा केला.

"जगण्यापेक्षा मरण बरं", Whatsapp Status ठेवत तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या

या प्रकरणी पोलिसांनी हिम्मतनगर येथील हसन नगरमध्ये राहणारी फसवणूक करणारी नववधू हिची ताब्यात घेऊन चौकशी केली. ज्यात तिने केवळ 30 हजार रुपये घेऊन लोकांच्या सांगण्यावरून लग्न केल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बनावट वधू हिनाला अटक करून न्यायालयात हजर केलं. तिथून न्यायालयाने तिची तुरुंगात रवानगी केली.

First published:
top videos

    Tags: Bride, Bridegroom, Marriage, Money fraud, Police arrest, Wedding