• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • गर्लफ्रेंडसाठी बॉयफ्रेंड बनला चोर, सॅनिटरी पॅडही करायचा लंपास; असं फुटलं बिंग

गर्लफ्रेंडसाठी बॉयफ्रेंड बनला चोर, सॅनिटरी पॅडही करायचा लंपास; असं फुटलं बिंग

आपल्या गर्लफ्रेंडसाठी चोऱ्या करणाऱ्या (Police arrested a youth stealing things for his girlfriend) एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 19 ऑक्टोबर : आपल्या गर्लफ्रेंडसाठी चोऱ्या करणाऱ्या (Police arrested a youth stealing things for his girlfriend) एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, असं म्हणतात. मात्र जर एखादा तरुण प्रेमिकेसाठी चोरी करत असेल आणि त्याला तिचीही (Theft for girlfriend) साथ असेल, तर मात्र तो गुन्हा ठरतो. आपल्या प्रेयसीच्या सांगण्यावरून कामाच्या (Police arrested youth) ठिकाणी चोरी करताना त्याला अटक करण्यात आली. मालकाला आला संशय मध्यप्रदेशमधील बैतुलमध्ये राहणारा अमन भोसले हा तरुण एका मेडिकलच्या दुकानात काम करत असे. गेल्या काही दिवसांपासून दुकानाच्या हिशेबात फरक पडत असल्याचा संशय दुकानाच्या मालकाला येत होता. त्यामुळे एक दिवस मालकानं दुकानाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्याला धक्का बसला. दुकानातून अमन कॅशची आणि इतर वस्तूंचीही चोरी करत असल्याचं दिसून आलं. एकूण 20 वेळा त्यानं दुकानात चोरी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आलं. दुकानातील पैशांचं ड्रॉवर उघडून तो सराईतपणे चोरी करायचा. सॅनिटरी पॅडचीही करायचा चोरी हा तरुण दुकानातून सॅनिटरी पॅडचीही चोरी करत असल्याचं दिसून आलं. हा तरूण नेमका कुणासाठी हे पॅड चोरत होता, याचा तपास पोलिसांनी केला असता आपल्या गर्लफ्रेंडसाठी तो हे करत असल्याचं निष्पन्न झालं. त्याशिवाय दुकानातील मास्क, सॅनिटायझर, परफ्युम अशा अनेक गोष्टी त्यानं लांबल्याचंही तपासात समोर आलं. हे वाचा- 1 डिसेंबरपासून TV पहाणं महागणार, चॅनेल्ससाठी भरावी लागणार इतकी अधिकची रक्कम पोलिसांची कारवाई सुरू पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून 50 हजारपेक्षा जास्त रुपयांची चोरी केल्याचं दिसून आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा नर्सिंगचा विद्यार्थी असून मेडिकलमध्ये तो पार्ट टाईम जॉब करत होता. गर्लफ्रेंडची फर्माईश पूर्ण करण्यासाठीच आपण चोरी करत असल्याची कबुली तरुणानं पोलिसांना दिली आहे.
  Published by:desk news
  First published: