• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • सासुरवाडीतील तरुणीशी मैत्री करून बनवला अश्लील VIDEO, मग केली शरीरसंबंधांची मागणी

सासुरवाडीतील तरुणीशी मैत्री करून बनवला अश्लील VIDEO, मग केली शरीरसंबंधांची मागणी

सासुरवाडीतील तरुणीशी फोनवरून मैत्री करून नंतर तिला ब्लॅकमेल करणाऱ्या (Police arrested a youth for blackmailing girl with nude photos) एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 • Share this:
  जैसलमेर, 24 ऑक्टोबर : सासुरवाडीतील तरुणीशी फोनवरून मैत्री करून नंतर तिला ब्लॅकमेल करणाऱ्या (Police arrested a youth for blackmailing girl with nude photos) एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आपल्या पत्नीच्या माहेरी राहणाऱ्या एका तरुणीसोबत या तरुणाने (Friendship and blackmail) ओळख वाढवत मैत्री केली. मात्र जेव्हा या तरुणाचं खरं रुप तिला समजलं, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली. रोज करायचा फोन राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणारा फरस सिंह नावाच्या तरुणाने त्याच्या सासूरवाडीतील एका तरुणीशी फोनवरून ओळख वाढवली होती. त्यानंतर या ओळखीचं मैत्रीत रुपांतर झालं. आरोपी फरस सिंह तरुणीशी व्हिडिओ कॉलवरून हळूहळू अश्लील संभाषण करू लागला. काही अश्लील फोटो दाखवत तरुणीलाही त्यासाठी उद्युक्त करत असे. या काळात  फरस सिंहने तरुणीने काही अश्लिल फोटो आणि  व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले. काही काळानंतर ते फोटो तिला दाखवत शरीरसंबंधांची मागणी केली. तरुणीने दिला नकार फरस सिंहचं खरं रुप समजल्यानंतर धक्का बसलेल्या तरुणीनं शरीरसंबंधांना नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या फरसनं तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने पोलीस स्टेशनला धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी कारवाई करत फरसला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. हे वाचा- अपंग, मुक्या मुलीवर मुंबईतील फिजिओथेरपिस्ट वर्षभरापासून करत होता Rape, अटक फरसच्या कुटुंबीयांचा दबाव फरसविरोधात तक्रार करू नये, यासाठी त्याच्या सासरच्या मंडळींनी तरुणीवर दबाव आणल्याची माहितीही तिनं दिली आहे. तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी तिला देण्यात आली. मात्र या धमक्यांना न घाबरता तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फरसचा मोबाईल जप्त केला असून त्यातून अश्लील फोटो आणि व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: