मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /VIDEO : एका कॉलने सुरू झालेली लव्हस्टोरी; मग कपलचा स्कूटीवर रोमान्स, आता मिळाली शिक्षा

VIDEO : एका कॉलने सुरू झालेली लव्हस्टोरी; मग कपलचा स्कूटीवर रोमान्स, आता मिळाली शिक्षा

उत्तर प्रदेश पोलिसांनी चिनहट येथील विक्की शर्माला अटक केली आहे. त्याने लखनौच्या हजरतगंजमध्ये स्कूटीवर एका किशोरवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केलं होतं

उत्तर प्रदेश पोलिसांनी चिनहट येथील विक्की शर्माला अटक केली आहे. त्याने लखनौच्या हजरतगंजमध्ये स्कूटीवर एका किशोरवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केलं होतं

उत्तर प्रदेश पोलिसांनी चिनहट येथील विक्की शर्माला अटक केली आहे. त्याने लखनौच्या हजरतगंजमध्ये स्कूटीवर एका किशोरवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केलं होतं

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    लखनऊ 19 जानेवारी : उत्तर प्रदेश पोलिसांनी चिनहट येथील विक्की शर्माला अटक केली आहे. त्याने लखनौच्या हजरतगंजमध्ये स्कूटीवर एका किशोरवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केलं होतं. पोलिसांनी 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याला शोधलं. विकीला अटक करण्यात आली असून, त्याची स्कूटी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती हजरतगंजचे प्रभारी निरीक्षक अखिलेश मिश्रा यांनी दिली. तसंच विक्की कपड्याच्या दुकानात काम करतो, असंही त्यांनी सांगितलं. ‘अमर उजाला’ने या संदर्भात वृत्त दिलंय.

    चालत्या स्कूटीवरच कपलचा रोमान्स, बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे, VIDEO VIRAL

    15 जानेवारीला संध्याकाळी तो मुलीसोबत फिरायला गेला होता. दरम्यान, हजरतगंजमधून जात असताना कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला, असं त्याने पोलीस चौकशीत सांगितलं. प्रभारी निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये स्पष्टता नसल्याने तरुणाची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आम्ही 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. हजरतगंजकडून ते आयटीकडे जाताना एका रस्त्यावर ही स्कूटी दिसली. आयटी चौकात स्कूटीचा नंबर क्लिअर करण्यात आला आणि त्यानंतर तरुणाची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली.

    विकीने सांगितलं की, मुलीच्या वडिलांचं दुकान त्याच्या दुकानाजवळ आहे. वर्षभरापूर्वी मुलीच्या वडिलांचा मोबाईल घरीच राहिला होता. त्यामुळे त्यांनी विक्कीच्या मोबाईलवरून मुलीच्या नंबरवर कॉल केला होता. यानंतर विकी आणि ती मुलगी मोबाईलवर बोलू लागले आणि सोशल मीडियावर चॅटिंग करू लागले. मैत्री वाढल्यानंतर मुलगी वडिलांच्या दुकानात येण्याच्या बहाण्याने विकीला भेटू लागली. तसंच विकी तिला घरी सोडण्यासाठी स्कूटी घेऊन जायचा. 15 जानेवरीलादेखील तो मुलीला घरी सोडायला जात होता; पण त्याचा व्हिडिओ बनवून कोणीतरी व्हायरल केला आणि त्याला अटक झाली.

    IPC चे कलम 294 नुसार विकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम अश्लील कृत्य करणं किंवा अश्लील गाणं वाजवणं किंवा सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह शब्द बोलणे अशा गुन्ह्यांसाठी आहे. या अंतर्गत तीन महिने जेल आणि दंडाची तरतूद आहे. या शिक्षेत वाढ होऊ शकते, तसेच या कलमांतर्गत कारवाई झाल्यास जामीन मिळू शकतो.

    लग्नात तरुणाने नवरी-नवरदेवाच्या अंगावरच मारली उडी; पुढं जे केलं ते पाहून व्हाल हैराण...VIDEO

    याशिवाय विकीवर आयपीसी कलम 279 लावण्यात आले आहे. यानुसार कोणी सार्वजनिक रस्त्यांवर निष्काळजीपणे वाहन चालवल्यास कारवाई होते. मानवी जीवाला धोका किंवा कोणत्याही व्यक्तीला इजा होण्याची शक्यता असेल, अशा पद्धतीने गाडी चालवणाऱ्यांवर या कलमाअंतर्गत कारवाई केली जाते. ही कलमं लावल्यास सहा महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसंच एक हजार रुपये दंडाचीही तरतूद आहे. किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात.

    First published:

    Tags: Crime, Romance, Video viral