नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : राजधानी दिल्लीतून (Delhi Crime) एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 31 वर्षीय व्यक्तीनं आपल्या माजी मालकाच्या पत्नीची हत्या केली (Murder of Boss' Wife) आहे. नोकरीवरुन काढून टाकल्याच्या रागात त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं असून पोलिसांना आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मंगळवारी सांगितलं, की वाहन चालक राकेश याने बुराडीच्या वेस्ट संत नगरमध्ये सोमवारी पिंकी हिची गळा घोटून आणि विजेचा शॉक देऊन हत्या केली. यावेळी महिला घरी एकटीच होती.
बापरे! पतीशी वारंवार खोटं बोलून केलं 'हे' धक्कदायक काम; वाचून बसेल धक्का
पोलीस उपायुक्त सागर सिंह कलसी यांनी सांगितलं, की आरोपी राकेशने सोमवारी बुराडीमध्ये पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला आहे. यानंतर पोलिसांनी पिंकीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. कलसी यांनी सांगितलं, की बुराडी ठाण्यात राकेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान राकेशनं सांगितलं की तीन वर्षाआधी त्याची भेट विरेंद्र कुमारसोबत झाली होती. तो दिल्लीच्या विश्वविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर होता. कुमारने राकेशला आपली टॅक्सी दिली आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर राहण्यासाठी खोली दिली. राकेशला प्रत्येक महिन्याला पगार मिळत नव्हता, त्यामुळे त्याने कुमारला म्हटलं की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा सर्व पैसे एकत्रच दे.
राकेशनं पोलिसांना सांगितलं की पिंकीने आपल्या पतीला सांगितलं की राकेशला घरातून आणि नोकरीवरुन काढ. सोबतच त्याचा संपूर्ण पगार देण्यासही तिनं नकार दिला. हा पगार तब्बल तीन लाख रूपये होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी राकेशला समजलं की कुमार आपल्या आईला घेऊन रुग्णालयात गेला आहे आणि पिंकी घरी एकटीच आहे. तो नशेतच कुमारच्या घरी गेला आणि गळा आवळून पिंकीची हत्या केली.
Cold Blooded! मी वहिनीचा खून केलाय, पोलीस स्टेशनमध्ये जात आरोपीची कबुली
राकेशनं हेदेखील सांगितलं, की गळा दाबल्यानंतर त्यानं पिंकीला विजेचा शॉकही दिला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणाची तपास सध्या सुरू आहे. तसंच शवविच्छेदनानंतरच राकेशनं पिंकीला खरंच विजेचा शॉक दिला का? हे स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder