मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ATM मधून काढायचा पैसे, एरर आल्याचं सांगून बँकेकडूनही घ्यायचा रिफंड

ATM मधून काढायचा पैसे, एरर आल्याचं सांगून बँकेकडूनही घ्यायचा रिफंड

एटीएममधूनही पैसे काढायचे आणि तेवढाच रिफंड बँकेकडून घ्यायचा, अशी लबाडी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

एटीएममधूनही पैसे काढायचे आणि तेवढाच रिफंड बँकेकडून घ्यायचा, अशी लबाडी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

एटीएममधूनही पैसे काढायचे आणि तेवढाच रिफंड बँकेकडून घ्यायचा, अशी लबाडी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 17 डिसेंबर: बँकेतील एटीएममधून (Bank ATM) अगोदर कॅश काढायची (Cash Withdrawal) आणि नंतर एरर (Error) आल्याचं भासवून बँकेकडूनही रिफंड (Cash Refund) घ्यायची, अशी क्लुप्ती करणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या (arrested) ठोकल्या आहेत. जर तुम्ही कुठल्याही एटीएममध्ये गेलात, पैसे काढलेत मात्र पैसे न मिळता ते खात्यावरून कट झाले, तर तुम्ही काय कराल? बँकेकडं जाऊन त्याचा रिफंड मागाल. मात्र हा गुन्हेगार एटीएममधून काढलेले पैसे घ्यायचाच, शिवाय तेवढीच रक्कम बँकेकडूनही वसूल करायचा. त्याचे हे छक्केपंजे समजल्यावर पोलीसही हैराण झाले.

असा करायचा चोरी

बँकेच्या एटीएम मशीनमधील काही गोष्टींचा गैरफायदा घेऊन हा आरोपी हातचलाखी करत असे. हरियाणाच्या मेवातचा रहिवासी असणारा अझरुद्दीन नावाचा आरोपी बँकांकडून अशा प्रकारे लाखो रुपये लुटत असे. सुरुवातीला तो एटीएममधून रक्कम काढत असे. मशीनमधून पैसे बाहेर आले तरी पुढले 15 सेकंद त्या पैशांना हात लावत नसे. मग आपोआप मशीनमध्ये एरर येई. ज्या क्षणी एरर येतो, त्या क्षणी पैसे परत घेतले जातात. मात्र एररची सूचना दिसल्या दिसल्या तो झटक्यात पैसे घ्यायचा आणि स्वतःपाशी ठेऊन द्यायचा.

बँकेकडून मागायचा रिफंड

बँकेकडे जाऊन आपल्या एटीएमच्या व्यवहारात एरर आल्याचं सांगून रिफंडची मागणी करायचा. व्यवहारात एरर येऊन पैसे कट झाल्याचं रेकॉर्ड पाहून बँकेकडून त्याला पैसे दिले जायचे. या गोरखधंद्यातून त्याने आतापर्यंत लाखो रुपये कमावले होते.

हे वाचा- धक्कादायक!Online classसुरू असतानाच Smartphoneचा स्फोट आणि विद्यार्थ्याचा जबडा...

17 कार्ड जप्त

पोलिसांनी अझरुद्दीनकडून 17 एटीएम कार्ड जप्त केले आहेत. वेगवेगळ्या बँकांचे हे कार्ड असून परिसरातील जवळपास सर्व बँकांमध्ये त्याने आपली खाती उघडली होती. एका बँकेत वारंवार गेल्यामुळं संशय येऊ नये, यासाठी अनेक खात्यांचा आधार घेत ही चोरी सुरू ठेवली होती. दिल्ली पोलिसांनी याबाबत तपास करून आरोपीला अटक केली आहे.

First published:

Tags: ATM, Crime, Money, Police, Theft, बँक