• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पळून जात केलं अल्पवयीन मुलासोबत लग्न; लैंगिक अत्याचाराच्या आरोपात तरुणीला अटक

पळून जात केलं अल्पवयीन मुलासोबत लग्न; लैंगिक अत्याचाराच्या आरोपात तरुणीला अटक

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

19 वर्षाच्या मुलीचं 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं आणि यानंतर तिनं त्याच्यासोबत लग्नही केलं (19 Year Old Girl Married to Minor). मात्र, लग्नानंतर ती अडचणीत आली

 • Share this:
  चेन्नई 31 ऑगस्ट : एक थक्क करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका 19 वर्षाच्या मुलीचं 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं आणि यानंतर तिनं त्याच्यासोबत लग्नही केलं (19 Year Old Girl Married to Minor). मात्र, लग्नानंतर ती अडचणीत आली, कारण तिच्याविरोधात लैंगिक शोषणाचा (Sexually Assaulting) गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली. ही घटना तमिळनाडूच्या कोईम्बतूर (Coimbatore) येथील आहे. मुलीला पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केलं आणि यानंतर कोईम्बतूर केंद्रीय जेलच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की दहावीत नापास झाल्यानंतर या मुलीनं शिक्षण सोडलं होतं. यानंतर ती कोईम्बतूरच्या पोलाचीमध्ये पेट्रोल पंपावर नोकरी करू लागली. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घटनेतील मुलगाही त्याच पेट्रोल पंपावर काम करू लागला. याचदरम्यान या तरुणीचं अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं आणि नंतर ती त्याच्यासोबत डिंडिगुल येथे गेली. पत्नीच्या निधनानंतर दु:खानं आतून पोखरलं; पुण्यात पोलीस ऑफिसरनं स्वत:ला संपवलं पोलिसांनी सांगितलं, की या मुलीनं डिंडिगुलमध्येच आपल्याहून दोन वर्षांनी लहान असलेल्या मुलासोबत लग्न केलं आणि पुन्हा कोईम्बतूर येथे आली. यानंतर दोघंही भाड्याच्या घरात राहू लागले. मुलाच्या आईनं पोलिसांकडे मुलीविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखली केली. जेव्हा संबंधित तरुणीला याबाबत माहिती झालं तेव्हा ती स्वतःच महिला ठाण्यात पोहोचली. पतीच्या फोनमध्ये दुसरीचा फोटो पाहून भडकली पत्नी; मध्यरात्रीच जे केलं ते हादरवणार पोलिसांनी सांगितलं, की 19 वर्षीय तरुणीला अल्पवयीन मुलासोबत लग्न केल्यानं अटक करण्यात आली आहे. यासोबतच 17 वर्षीय मुलासोबत लग्न करून त्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातही तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही तरुणी सध्या जेलमध्ये आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: