मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुणं हादरलं! शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर आधी घरात घुसून बलात्कार, मग अपहरण करून मुंबईला नेलं अन्..

पुणं हादरलं! शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर आधी घरात घुसून बलात्कार, मग अपहरण करून मुंबईला नेलं अन्..

19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती.  यानंतर जेव्हा ती घरी परतली आणि आपली कपडे बदलू लागली तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला.

  • Published by:  Kiran Pharate
पुणे 08 ऑगस्ट : पुण्याच्या गुलटेकडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपीला अटकही करण्यात आली आहे. नागपूरात आई-वडिलांकडून 5 वर्षांच्या मुलीवर Black Magic; प्रश्नांची उत्तरं दिली नाही म्हणून मारून मारून घेतला जीव पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. यानंतर जेव्हा ती घरी परतली आणि आपली कपडे बदलू लागली तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला. आरोपीने अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 4 महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडलं; तर पदराने गळा आवळून पत्नीचा खून, प्रेमविवाहानंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य हे सगळं इथेच थांबलं नाही, तर जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने वारंवार तिच्यावर बलात्कार करत राहिला. जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने या मुलीचं अपहरण करून तिला मुंबईत ठेवलं. स्वारगेट पोलिसांनी सांगितलं की आम्ही या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवलं आहे. 'उपचारादरम्यान मुलीने सांगितलं की, तिच्या शेजाऱ्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे', असंही पोलिसांनी सांगितलं.
First published:

Tags: Pune crime news, Rape case

पुढील बातम्या