मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लेडी डॉनच्या बहिणीवर प्रेम करणं तरुणाला पडलं महागात; LOVE STORY चा झाला वेदनादायी शेवट

लेडी डॉनच्या बहिणीवर प्रेम करणं तरुणाला पडलं महागात; LOVE STORY चा झाला वेदनादायी शेवट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उर्फ भारतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या प्रियकराचं अपहरण (Abduction) करुन त्याला चालत्या ट्रक समोर फेकून दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उर्फ भारतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या प्रियकराचं अपहरण (Abduction) करुन त्याला चालत्या ट्रक समोर फेकून दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उर्फ भारतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या प्रियकराचं अपहरण (Abduction) करुन त्याला चालत्या ट्रक समोर फेकून दिल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली 21 मार्च : गेल्या काही वर्षांत प्रेम प्रकरणातून गुन्हे (Crime) घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा गुन्ह्यांमध्ये महिलांचाही सहभाग दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अशाच एका प्रेमप्रकरणातून घडलेल्या अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्यातील एका फरार लेडी डॉनला (Lady Don) नुकतीच अटक केली आहे. निधी उर्फ भारती (वय 27) असं या लेडी डॉनचं नाव आहे. ती गेल्या चार वर्षांपासून फरार (Abscond) होती. साथीदारांच्या मदतीनं आपल्या बहिणीच्या प्रियकराचं अपहरण करुन त्याला चालत्या ट्रकसमोर फेकून दिल्याचा आरोप निधीवर (Nidhi) आहे. ट्रकखाली चिरडून त्या प्रियकराचा मृत्यू झाला आणि तो अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं. जामीन मिळाल्यानंतर ती न्यायालयात हजर राहत नसल्याने तिला न्यायालयाने 2018 मध्ये फरार घोषित केलं होतं. पत्नीने दारू प्यायल्याने पतीची सटकली;कुऱ्हाडीचा घाव घालत दिली आयुष्यभराची शिक्षा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उर्फ भारतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या प्रियकराचं अपहरण (Abduction) करुन त्याला चालत्या ट्रक समोर फेकून दिल्याचा आरोप आहे. निधी ही कुख्यात गँगस्टर राहुल जाट याची पत्नी आहे. राहुल हा गँगस्टर रोहित चौधरी आणि मृत अंकित गुर्जरचा साथीदार आहे. निधी आणि तिचा पती गँगस्टार राहुल याने आपल्या नऊ साथीदारांच्या मदतीने 1 एप्रिल 2015 रोजी सागर उर्फ चुन्नू याला आपल्या घरी बोलवून जीटीबी एन्क्लेव्ह येथून त्याचं अपहरण केलं होतं. यावेळी या लोकांनी सागरला बांधून बेदम मारहाण केली आणि त्याला बागपत येथे नेलं आणि मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक समोर फेकून दिलं. ट्रकच्या चाकांखाली चिरडून सागरचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा रस्ते अपघात आहे, असं दर्शवण्याचा प्रयत्न या प्रकरणातील आरोपींनी केला होता. परंतु, पोलीस चौकशीत कट उघड झाला. पत्नी मटण बनवत नसल्याने भडकला पती; रागात थेट पोलिसांनाच फोन लावला अन्... याबाबत विशेष पोलीस पथकाचे डीसीपी जसमीन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ``पोलीस इन्स्पेक्टर शिवकुमार यांना निधी उर्फ भारतीच्या गाझियाबादमधल्या गोविंदपुरम येथील कारवायांची माहिती मिळाली होती. ती 19 मार्च रोजी गोंविदपुरम येथील एका कॅफेत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. एसीपी अत्तर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर शिवकुमार आणि एसआय राजेश शर्मा यांच्या पथकाने 19 मार्चला संध्याकाळी कॅफेला घेराव घालत निधीला (रा. सफिराबाद, राजपूर, फारुख नगर, लोणी गाझियाबाद) अटक केली.`` दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात उत्तम नगर पोलिसांनी हेरॉईनची (Heroin) तस्करी (Smuggling) करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी या महिलेकडून 20 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केलं आहे. पोलीस (Police) या महिला आरोपीची कसून चौकशी करत असून, हेरॉईन सप्लायरला अटक करण्याासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत जिल्हा पोलीस उपायुक्त शंकर चौधरी यांनी सांगितलं, की सुरेखा (वय 49, रा. जे.जे. कॉलनी, उत्तम नगर ) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. जिल्हा पोलीस अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या आरोपींना शोधून त्यांना अटक करतात. यासाठी पोलिसांचे पथक या परिसरात सातत्याने गस्त घालत असतं.
First published:

Tags: Crime news, Murder news

पुढील बातम्या