Home /News /crime /

निर्दयी आई! पोटच्या 3 चिमुकल्यांची केली हत्या, कार चोरी करून झाली फरार

निर्दयी आई! पोटच्या 3 चिमुकल्यांची केली हत्या, कार चोरी करून झाली फरार

एका अपार्टमेंटमध्ये पाच वर्षाखालील तीन बाळांचे मृतदेह आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी मुलांच्या आईला (Mother Kills Children) ताब्यात घेतलं आहे.

    नवी दिल्ली 11 एप्रिल: आई आणि मुलांचं नातं हे जगभरात अगदी सारखंच आहे. निस्वार्थी प्रेम म्हणून या नात्याकडे पाहिलं जातं. मात्र, आता अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये घडलेली एक घटना हदरवून टाकणारी आहे. इथे एका अपार्टमेंटमध्ये पाच वर्षाखालील तीन बाळांचे मृतदेह आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी मुलांच्या आईला (Mother Kills Children) ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आरोपी महिला लिलियाना कारिलो हिला लॉस एंजलिस पोलिसांनी शहरापासून तब्बल 322 अंतरावर असणाऱ्या तुलारे काउंटी इथून ताब्यात घेतलं. लॉस एंजलिस पोलिसांनी सांगितलं, की मुलांची आजी जेव्हा कामावरुन घरी परतली तेव्हा तिनं अपार्टमेंटमध्ये मुलांचे मृतदेह पाहिले. यावेळी मुलांची आई बेपत्ता होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, या मुलांचा मृत्यू चाकूनं हल्ला केल्यानं झाला आहे. मात्र, याप्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. पोलिसांनी सांगितलं, की आम्ही तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत, की या मुलांची हत्या का केली गेली. 5 महिन्यांनंतर कबरीतून बाहेर काढावा लागला मृतदेह, न्यायालयानं का दिला असा आदेश? पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कारिलो आपल्या कारनं जात होती. मात्र, बेकर्सफील्ड परिसरात तिचं कोणासोबत तरी भांडण झालं. यानंतर तिनं आपली कार तिथेच सोडली आणि दुसऱ्याची कार हिसकावून घेत ती फरार झाली. कारिलो हिला बेकर्सफील्डपासून तब्बल 322 किलोमीटर दूर असलेल्या तुलारे काउंटीच्या पोंडेरोसा परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं, की सध्या या महिलेनं हत्या केला असल्याचा संशय आहे. आम्ही वेगवेगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहोत. या हत्येमध्ये आणखी कोणी सामील होतं का? याचा तपास करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime, Murder, Murder Mystery

    पुढील बातम्या