Home /News /crime /

विष घेतले पण पत्नीला नांदवण्यास दिला नकार, बीडमधील संतापजनक घटना

विष घेतले पण पत्नीला नांदवण्यास दिला नकार, बीडमधील संतापजनक घटना

बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात आज दुपारी 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली.

बीड, 04 जानेवारी :  'पत्नीला नादवायचं नाही म्हणत एका तरुणाने  बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात विष घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या तरुणाला तातडीने  बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  इम्तियाज आमेन बकुरेशी (वय 30) असं विष घेणाऱ्या तरुणाचं नाव आहे.  बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात आज दुपारी 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली. पत्नीला नांदवण्यास घेऊन जाणार नाही म्हणत इम्तियाज आमेन कुरेशीने विष प्राशन केले. गेवराई शहरातील रहिवाशी असलेल्या इम्तियाज आमेन कुरेशी यांचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन अपत्य आहेत. एका वर्षापूर्वी पती पत्नीत वाद झाल्यापासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने 20  दिवसांपूर्वी पत्नीने तक्रार केली होती. या तक्रारीवर आज महिला तक्रार निवारण केंद्रात तिसरी तारीख होती. पत्नी नांदण्यास तयार असताना तिला नांदवणार नाही, या भूमिकेवर इम्तियाज ठाम होता. पण त्याची पत्नीही नांदण्यासाठी तयार होती. महिला तक्रार निवारण केंद्राने सुद्धा त्याला पत्नीला नांदवण्यास समजूत घालून दिली होती. पण, संतापलेल्या इम्तियाज याने पोलीस स्टेशनच्या आवारातच विष प्राशन केले.  पोलीस कर्मचारी असताना हा प्रकार घडल्याचे त्यांची पत्नी सांगत आहे. त्यानंतर इम्तियाजला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या