पाटना, 25 ऑक्टोबर : पाटनातील (Patna News) मॉडल मोना राय (Model Mona Roy) हिच्या हत्या प्रकरणात मोठी बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बिल्डरच्या पत्नीने सुपारी देऊन 36 वर्षीय मॉडेल मोनाची हत्या (Murder) करवून आणली होती. मोनाला 12 ऑक्टोबर रोजी अज्ञात गुंडानी गोळी मारली होती. त्याच्या 5 दिवसांनंतर म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी मोनाने रुग्णालयात जीव सोडला. अखेर या मर्डर मिस्ट्रीचा (Murder Mystery) खुलासा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोना रॉय 12 ऑक्टोबर रोजी आपल्या 11 वर्षीय मुलीसह घरी परतत होती. दरम्यान रात्री 10 वाजता बाईक स्वार हल्लेखोरांनी तिच्यावर गोळी झाडली. या घटनेत तिच्या मुलीचा जीव वाचला, मात्र तिचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मोनाला शहराजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र 5 दिवस सुरू असलेल्या उपचारानंतर 17 ऑक्टोबरला मोनाचा मृत्यू झाला.
मोना रॉय मर्डर केसच्या तपासादरम्यान बिहार पोलिसांनी जेव्हा कॉल डिटेल्स पाहिले तेव्हा राजू नावाच्या बिल्डरचं नाव समोर आलं. सुरुवातील त्याच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली नव्हती. मात्र त्याच्या घरात दारू सापडली. बिहारमध्ये दारू बंदी आहे. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं.
यादरम्यान पोलिसांना आणखी एक संशयास्पद नंबर सापडला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार हा नंबर भीम यादव नावाच्या शूटरचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. यात लक्षात आलं की, बिल्डर राजूच्या पत्नीनेही शूटरला मोना रॉयच्या हत्येची सुपारी दिली होती.
हे ही वाचा-नवरा घरी नसताना घडलं विपरीत; विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह, कोल्हापुरातील घटना
बिल्डर राजू आणि मॉडलमध्ये विवाहबाह्य संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डरने मोनाला एक फ्लॅट देखील दिला होता. ही बाब राजूच्या पत्नीला आवडली नाही आणि तिने मोनाची हत्या करण्याचं कारस्थान आखलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोना रॉयच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी देण्यात आली होती. यासाठी बिल्डरच्या पत्नीने शूटरला सुपारी दिली होती. मोना रॉय एक टिकटॉक स्टार देखील होती आणि तिने काही वर्षांपूर्वी मॉडलिंग सुरू केली होती. ती 2021 मध्ये मिस अँड मिसेस ग्लोबल बिहार स्पर्धेत उपविजेती ठरली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Murder Mystery, Patna