मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गरम तव्यावर अंगठा ठेवला, अलगत त्वचा काढून मित्राच्या बोटाला चिकटवली; रेल्वेतील नोकरीसाठी विद्यार्थ्याचा प्रताप

गरम तव्यावर अंगठा ठेवला, अलगत त्वचा काढून मित्राच्या बोटाला चिकटवली; रेल्वेतील नोकरीसाठी विद्यार्थ्याचा प्रताप

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

रेल्वेत नोकरी मिळावी, म्हणून तरुणाचं धक्कादायक कृत्य..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

गांधीनगर, 26 ऑगस्ट : गुजरातच्या वडोदरामधून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथील एका तरुणाने रेल्वेच्या परीक्षेत यशस्वी होण्याच्या इच्छेने स्वत:ऐवजी मित्राचीच रवानगी केली. इतकच नाही त्यांनी बायोमेट्रिक वेरिफिकेशनमध्ये काही अडथळा येऊ नये यासाठी असं काही कृत्य केलं की, कोणालाही धक्काच बसले. या पठ्ठ्याने आपल्या अंगठ्याची त्वचा कापून मित्राच्या अंगठ्याला चिकटवली.

आधी गरम तव्यावर ठेवला अंगठा अन्...

बिहारचा राहणारा मनिष कुमार याने आपला अंगठा गरम तव्यावर ठेवला. यानंतर अंगठ्याची त्वचा निघू लागली. त्याने ती त्वचा कापून मित्र राज्यगुरू गुप्ता याच्या अंगठ्यावर चिकटवली. आणि स्वत:च्या जागेवर मित्राला परीक्षा द्यायला पाठवलं. परीक्षा देण्यासाठी राज्यगुरू सेंटरवर पोहोचला तर त्याला बायोमेट्रिक वेरिफिकेशन करण्यास सांगण्यात आलं. त्याने बायोमेट्रिक स्कॅनरवर अंगठा ठेवला, मात्र त्याची नोंद रद्द दाखवण्यात आली.

त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, मात्र त्याचं वेरिफिकेशन झालंच नाही. यावेळी तेथील स्टाफला संशय आला. त्यांनी आधी त्याच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे केला आणि त्याच्या अंगठ्याची त्वचा निघाली. त्वचा निघताच त्याची पोलखोल झाली.

फसवणूक केल्याच्या प्रकरणात दोघांना अटक...

फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भारतीय दंड संहिता कलम 465, 419, 120-बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, मनीष अभ्यासात चांगला नाही. तर त्याचा मित्र राज्यगुरू हुशार आहे. मनिषला रेल्वेत नोकरी हवी होती. यासाठी त्याने राज्यगुरूला परीक्षा देण्यासाठी पाठवलं. या परीक्षेत साधारण 600 उमेदवार सामील झाले होते. फसवणूक रोखण्यासाठी सर्व उमेदवारांना आपल्या अंगठ्याचं निशाण देणं बंधनकारक आहे.

 

First published:

Tags: Crime news, Indian railway, Job, Railway jobs