एका फटक्यात केकचे दोन तुकडे, पठ्याने कोयत्याने कापला केक, VIDEO

एका फटक्यात केकचे दोन तुकडे, पठ्याने कोयत्याने कापला केक, VIDEO

सोहेल शेख यांचा वाढदिवस असल्याने त्याने आणि त्याचा मित्राने मिळून लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 08 डिसेंबर : पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. दापोडीमध्ये वाढदिवसाला एका तरुणाने चक्क कोयत्याने केक कापल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील दापोडी भागात ही घटना घडली आहे. सोहेल शेख असं या तरुणाचे नाव आहे. सोहेल शेखने वाढदिवसाच्या दिवशी थेट कोयत्याने केक कापला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सोहेल शेख यांचा वाढदिवस असल्याने त्याने आणि त्याचा मित्राने मिळून लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. भर रस्त्यावर गाडी लावून केक कापण्यात आला होता. सोहेलने कोयत्याने एकापाठोपाठ दोन केक कापले होते. त्याचा मित्रांनीच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर व्हायरल करण्यात आला होता.

या व्हिडीओची दखल घेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोहेल शेख आणि त्याचा मित्रांचा शोध घेतला आणि ताब्यात घेतले. हत्यारांचे प्रदर्शन करून दापोडी परिसरामध्ये दहशत पसरवली म्हणून भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी समीर बागसीराज या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 8, 2020, 10:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या