मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तरुणीच्या घरी जाऊन Apple चे घड्याळ ढापणे पडले भारी, पोलीस अधिकारी गेला घरी!

तरुणीच्या घरी जाऊन Apple चे घड्याळ ढापणे पडले भारी, पोलीस अधिकारी गेला घरी!

तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत घेतले आणि तिच्या बोलण्याच्या ओघात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत घेतले आणि तिच्या बोलण्याच्या ओघात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत घेतले आणि तिच्या बोलण्याच्या ओघात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी चिंचवड, 01 मे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (pimpri chinchwad police commissioner) एका पोलीस अधिकाऱ्याने चक्क एका तक्रारदार महिलेशी लगट करत तिचीच घड्याळ ढापन्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची ही कृती पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी असल्याने त्याला पोलीस आयुक्तांनी (police commissioner) तात्काळ निलंबित करत चुकीला माफी नाही असा संदेश दिला आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी शहरातील हिंजवडी भागात राहणाऱ्या एका तरुणीचा भाऊ बेपत्ता झाल्याने त्याबाबत 24 एप्रिल रोजी तरुणी तक्रार देण्यासाठी रात्री उशिरा हिंजवडी पोलीस ठाण्यात गेली. त्यावेळी तक्रार घेतल्यानंतर संबधित आरोपी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर याने त्या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत घेतले आणि तिच्या बोलण्याच्या ओघात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने  वेळ मारून नेली. मात्र घरी पोहचल्यानंतर रेळेकर याने "आपण खूप कंटाळलो आहे" असे सांगून तरुणीकडे चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीने नाईलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले. त्यावेळी तरुणीची आई देखील घरात होत्या.

22 तास मृतदेह रुग्णालयातच पडून; बीडमध्ये प्रेताशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार

दरम्यान, चहा पिताना रेळेकर याने चार्जिंगला लावलेला अॅपल कंपनीचे (Apple Watch) घड्याळ खिशात घातले आणि तो निघून गेला. ही बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी ठाण्यात धाव घेत वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला. वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकर याने तरुणीचे घड्याळ माघारी दिले.

मात्र हा सगळा प्रकार पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारी असल्याचा ठपका ठेवत हिंजवडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही बाब कृष्ण प्रकाश यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रेळेकरला तात्काळ निलंबित केलं. प्रकाश यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

IT इंजिनिअर तरुणीचा पाठलाग करून भररस्त्यात फाडले कपडे, पुण्यातील घटना

दरम्यान, ही बाब दुर्दैवी असली तरीही  सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने जर कोणीही गैरप्रकार करीत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. आपल्या अधिकारी कर्मचारी जरी चुकत असले तरी त्यांची चूक पाठशी घातली जाणार नसल्याची भूमिका आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आधीच जाहीर केली होती. त्यानुसारच ही कारवाई केल्या गेल्याची माहिती गुन्हे शाखा - 2 चे अधिकारी श्रीकांत डिसले यांनी सांगितले.

First published:
top videos