मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट', बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या

'पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट', बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील देहू रोड पोलिसांनी एका संगणक अभियंत्याला अटक केलीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 7 ऑक्टोबर : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील देहू रोड पोलिसांनी एका संगणक अभियंत्याला अटक केलीय. वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून त्याने चक्क 112 या पोलीस कंट्रोलला फोन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट आहे आणि तो आमच्याच वसाहतीत होत असल्याचा फेक कॉल पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर केला. मुबंई आणि पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट करणार असल्याचेही त्याने सांगितले. या फोनमुळे पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले. पण चौकशीनंतर हा खोटा फोन असून वसाहतीमधल्या लोकांच्या आवाजाला कंटाळून मनोज अशोक हसे याने हा फोन केल्याचे स्पष्ट झालंय.

पोलिसांनी मनोज हसे याची विचारपूस केली असता त्याने पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. त्याप्ररकरणी पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केलीय. मनोज हसे हा देहूरोडच्या क्रांती चौक गणेश कॉलनीत राहतो. विशेष म्हणजे असाच एक कॉल यापूर्वी लोणावळा परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने करण्यात आला होता. तेव्हाही पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती.

(ठाण्यात आक्षेपार्ह शब्दात घोषणा, ठाकरे गटातील शिवसैनिकांवर कारवाई)

महाराष्ट्रात सध्या ही वेगळीच विकृती समोर येत आहे. दिग्गज नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन करायचे आणि पोलिसांना कामाला लावायचे हा नवीनच प्रकार आता सुरु झाला आहे. या विचित्र कृत्यांमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन कामाला लागतं. फोन नेमका कोणी केला, का केला? याचा तपास करताना पोलीस प्रशासनाचे देखील नाकेनऊ येते. असं कृत्य करणारे आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडतात पण त्यांच्या या कृत्यांमुळे पोलिसांची मोठी दमछाक होते. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होणं जास्त जरुरीचं आहे, जेणेकरुन असं कृत्य कुणीही करणार नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. पण असं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे.

First published:

Tags: Bomb Blast, Crime, Pune