पिंपरी-चिंचवडमध्ये SEX रॅकेटचा पर्दाफाश, समोर आली धक्कादायक माहिती

पिंपरी-चिंचवडमध्ये SEX रॅकेटचा पर्दाफाश, समोर आली धक्कादायक माहिती

पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्धवस्त केलं असून यामध्ये सामील असलेल्या सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 24 जानेवारी : पिंपरी चिंचवड परिसरात पुन्हा एकदा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्धवस्त केलं असून यामध्ये सामील असलेल्या सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

पिंपरी शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या स्पाईन सीटी मॉलमधील दुकान नंबर 3 व 4 मध्ये सिटी स्पा मसाज सेंटर" या नावाने पार्लर सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आपल्या सहकाऱ्यांमार्फत छापा मारला. यामध्ये स्पा चालविणाऱ्या आणि तिथे आढळून आलेल्या राजेश कानुरे,शिवा कोळपे,रितेश घाटकर,आणि विक्रम पलांडे ह्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सेक्स रॅकेटप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती

सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांवरही मसाज सेन्टरमधील तरुणींना वैश्याव्यवसाय करणयासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच तरुणींनी देहविक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम चारही आरोपी हे स्वतःची उपजीविका भागविण्यासाठी वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लग्नात अक्षदा पडल्यानंतर वाहिला रक्ताचा पाट, भरमंडपात तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून

ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं लक्षात घेत चारही आरोपी विरोधात भादवी कलम 370,34 आणि पिटा act 3,4,5 नुसार कारवाई करत त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तर मसाज सेन्टरमध्ये काम करणाऱ्या "त्या" सहा स्थानिक तरुणींची सुटका करण्यात आल्याची माहिती देत, स्पा मसाज सेन्टर च्या नावाखाली सुरू असलेल्या अशा कृत्या बद्दल कुणाला माहिती असल्यास तात्काळ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचं अहवान पोलिसांनी केलं आहे.    

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 01:03 PM IST

ताज्या बातम्या