बालपणीचा मित्रच जीवावर उठला, घरातून अपहरण करून डोक्यात घातला दगड

बालपणीचा मित्रच जीवावर उठला, घरातून अपहरण करून डोक्यात घातला दगड

सचिनचा खून करणारा मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 13 डिसेंबर : घरातून मित्राचं अपहरण करून 10 जणांच्या टोळक्याने त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरीतील चिखली परिसरात घडलेल्या या घटनेत 22 वर्षीय सचिन चौधरी नामक तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र सचिनचा खून करणारा मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

मृत्यू झालेला तरुण सचिन आणि आरोपी हे मित्र असून सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी शुक्रवारी सचिनचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आज शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सनी उर्फ नकुल कुचेकर आणि गौरव डांगले नामक दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, मुख्य आरोपी योगेश सावंत आणि मयत सचिन चौधरी हे दोघेही मित्र होते. त्यांची लहानपणापासून मैत्री होती. दरम्यान, सावंत याचे आर्थिक व्यवहार सचिन हा पाहायचा. मात्र, यात सचिनने फेरफार केल्याचा संशय योगेशला होता. त्यामुळेच शुक्रवारी इतर मित्राच्या साथीने राहत्या घरातून योगेशने सचिनचे अपहरण केले. त्याच रात्री इतर मित्रांच्या साथीने त्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला आणि तेथून सर्व जण पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

चिखली पोलीस सचिनचा शोध घेत होते. तेव्हा, आज सायंकाळी शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपीसह आठ जण फरार आहेत अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, अपहरनाप्रकरणी योगेश दिनेश सावंत, आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव, रुपेश प्रकाश आखाडे याच्यासह इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 13, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या