Home /News /crime /

धक्कादायक! फ्लाईट ऑटोपायलट मोडवर ठेवून वैमानिकाने उडत्या विमानात तरुणीसोबत ठेवले संबंध; अन् मग...

धक्कादायक! फ्लाईट ऑटोपायलट मोडवर ठेवून वैमानिकाने उडत्या विमानात तरुणीसोबत ठेवले संबंध; अन् मग...

वैमानिकाने विमान हवेत असतानाच आपल्या महिला पार्टनरसोबत संबंध ठेवल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे.

    नवी दिल्ली 26 मे : उडत्या फ्लाईटमध्ये घडलेल्या अशा अनेक धक्कादायक घटना समोर येतात, ज्या खूप चर्चेत राहतात. फ्लाईटने प्रवास करताना लोक निश्चितपणे आराम, लक्झरी आणि सुरक्षित प्रवास व्हावा अशी अपेक्षा ठेवतात. मात्र नुकतंच एका रशियन फ्लाइटमध्ये असा प्रकार घडला, ज्याबद्दल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. यात वैमानिकाने विमान हवेत असतानाच आपल्या महिला पार्टनरसोबत संबंध ठेवल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे (Shocking Act of Pilot). भारतात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव; प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखाहून अधिक रक्कम, रंजक आहे इतिहास या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. ही घटना रशियाशी संबंधित एका एअरलाईन्समध्ये घडली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, हे दोघंही फ्लाइट ऑटोपायलट मोडवर ठेवून शारीरिक संबंध ठेवत होते. हा सर्व प्रकार पायलट आणि प्रशिक्षणार्थी तरुणीने उडत्या विमानात केला. मात्र पाठीमागे असलेल्या याच महिलेच्या आणखी एका साथीदाराने या प्रकाराचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. यानंतर दोघांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. अतिरिक्त फ्लाईंग क्लास घेण्याच्या बदल्यात पायलटने महिला प्रशिक्षणार्थीला आपल्यासोबत रोमान्स करण्यास भाग पाडल्याने हा सर्व प्रकार घडल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला या तरुणीने वैमानिकाला नकार दिला, कारण तो विवाहित होता. मात्र, एक्स्ट्रा क्लाससाठी तिने हा प्रस्ताव मान्य केला. या तरुणीला याबद्दल विचारले असता, तिनं सांगितलं की ऑटोपायलट मोड ऑन केला गेला होता आणि हे सगळं करण्याची पहिलीच वेळ होती. ती यापुढे कधीही असं करणार नाही. मात्र ही चूक खूप मोठी असल्याने तिलाही नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. लग्न झालेल्या महिलेने मित्रासोबत घालवली रात्र, गर्भवती राहताच समोर आलं धक्कादायक सत्य विशेष म्हणजे अशी घटना पहिल्यांदाच समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती, ज्यात एका एअर होस्टेसने खुलासा केला होता की एका ब्रिटीश फुटबॉलपटूने उडत्या विमानात आपल्या पार्टनरसोबत संबंध ठेवले होते. ही बातमी जगभर व्हायरल झाली होती. अशीच एक धक्कादायक घटना न्यूझीलंडमधूनही समोर आली होती. जिथे एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला शारीरिक संबंध ठेवताना पकडलं गेलं होतं. इतकंच नाही तर तो तिथूनच पायलटशी बोलतही होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Airplane, Shocking news

    पुढील बातम्या