मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात दोन सख्या भावांकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मोबाइलमध्येही केलं शूट

पुण्यात दोन सख्या भावांकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मोबाइलमध्येही केलं शूट

ग्रामीण भागातील 19 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवण्यात आले. तसेच त्याला मारहाण करत फ्लॅटवर नेण्यात आले.

ग्रामीण भागातील 19 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवण्यात आले. तसेच त्याला मारहाण करत फ्लॅटवर नेण्यात आले.

ग्रामीण भागातील 19 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवण्यात आले. तसेच त्याला मारहाण करत फ्लॅटवर नेण्यात आले.

    पुणे, 21 जुलै : राज्यात अत्याचार बलात्कार, विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात सासऱ्याने सूनेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यातून आणखी एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात दोन सख्या भावांकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली. काय आहे संपूर्ण बातमी - दोन सख्या भावांनी पुण्याला काळीमा फासण्याचे कृत्य केल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील 19 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवण्यात आले. तसेच त्याला मारहाण करत फ्लॅटवर नेण्यात आले. यानंतर याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली आहे. शोहेब अन्सारी (वय 35) आणि अन्वर अन्सारी (वय 40), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेतील पीडित तरुण हा आरोपींच्याच गावाकडील असल्यामुळे तो आरोपींना ओळखतो. रात्री अकराच्या सुमारास कामावरून तो घरी निघाला होता. दरम्यान, घराजवळ आल्यानंतर आरोपी शोहेबने दुचाकीवरून येऊन त्याला रस्त्यात मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला दुचाकीवरून त्याच्या घरी नेले. तसेच त्याठिकाणी मोठ्या भावालाही बोलावून घेतले. हेही वाचा - पुण्यात 32 वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार, सासऱ्याने केली शरीरसुखाची मागणी तर पतीने ठेवले अनैसर्गिक संबंध यानंतर दोघांनी मिळून तरुणासोबत अनैसर्गिककृत्य केले. त्याचे शुटींग अन्वर अन्सारी याने त्याच्या मोबाईलमध्ये केले. तसेच त्यानंतर त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला, अशी तक्रार त्याने दिली आहे. याप्रकरणी 19 वर्षाच्या पिडीत तरुणाने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कोंढव्यातील दुराणी कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा या वेळेत घडला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Police, Pune crime news

    पुढील बातम्या