Home /News /crime /

Physical Abused Vasai : लग्नाचे आमिष देऊन महिला पोलीस सहकाऱ्यावर अत्याचार; लाखो रुपयेही उकळले आणि...

Physical Abused Vasai : लग्नाचे आमिष देऊन महिला पोलीस सहकाऱ्यावर अत्याचार; लाखो रुपयेही उकळले आणि...

एक महिला पोलीस शिपाई ही वसईत कार्यरत आहे. तिचे वय 28 इतके आहे. मात्र, तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यानेच तिच्यासोबत हा प्रकार केला आहे.

    पालघर, 27 मे : पोलीस (Police) समाजाच्या रक्षणाचं काम करतात. मात्र, हेच रक्षक जर भक्षक बनले तर...अशीच एक धक्कादायक घटना वसईतून (Vasai) समोर आली आहे. एका महिला पोलीस शिपायासोबतच (Woman Police Vasai) हा धक्कादायक प्रकार घटला आहे. नेमकं काय घडलं - एक महिला पोलीस शिपाई वसईत कार्यरत आहेत. तिचे वय 28 इतके आहे. मात्र, तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यानेच तिच्यासोबत हा प्रकार केला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने पीडित महिला पोलीस शिपाईला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच 27 ऑगस्ट 2019 पासून ते आजपर्यंत सतत तिच्यावर अत्याचार (Physical Abused) केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तालयात (Vasai Virar Police Commissionerate) एकच खळबळ उडाली आहे. महिला पोलीस शिपाईकडून लाखो रुपयेही उकळले - याप्रकरणी आणखी धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने लग्नासाठी हुंडा आणि तिच्या पगारातील आणि आगामी भविष्यासाठी साठवून ठेवलेली तब्बल 3 लाख 46 हजार 900 रुपये घेऊन तिची फसवणूक केली आहे. आरोपीने लग्नही केले - दरम्यान, आरोपीने आधी या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केले. तिच्याकडून लाखो रुपये उकळले. इतकेच नव्हे तर आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या आरोपीने आपल्या गावी जाऊन 6 फेब्रुवारीला लग्न करुन घेतले. ही बाब त्याने पीडित महिला पोलीस शिपायापासून लपवून ठेवली होती. मात्र, तपासादरम्यान हे सर्व खुलासे झाले आहेत. याप्रकरणी वसई पोलिसांनी बलात्कार आणि फसवणुक केल्याप्रकरणी या पुरुष पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Police, Vasai

    पुढील बातम्या