मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चारित्र्यावर संशयामुळे पत्नीला रात्री झोपेतून उचलले अन् मित्रांसोबत मिळून केलं धक्कादायक कृत्य

चारित्र्यावर संशयामुळे पत्नीला रात्री झोपेतून उचलले अन् मित्रांसोबत मिळून केलं धक्कादायक कृत्य

प्रीतमपुरी भागात युगंता गुर्जर नावाच्या महिलेची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून महिलेच्या कुटुंबीयांनी अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला होता.

  • Published by:  News18 Desk
सीकर, 16 जुलै : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या झाली होती. या हत्येबाबत पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. महिलेच्या पतीने मित्रांसोबत मिळून आपल्या पत्नीची हत्या केली. आरोपींनी 2 दिवस पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली आहे. यानतंर पोलिसांनी आरोपी पतीसह 3 जणांना अटक केली आहे. ही घटना सीकर जिल्ह्यातील प्रीतमपुरी भागातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतमपुरी भागात युगंता गुर्जर नावाच्या महिलेची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून महिलेच्या कुटुंबीयांनी अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाच्या तपासात पती महेंद्र गुर्जरसह त्याच्या दोन मित्रांनी तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. महेंद्रला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्यामुळेच त्याने तिच्या हत्येचा कट रचला होता. हा गुन्हा इतक्या हुशारीने करण्यात आला की कोणाच्या लक्षातही येऊ दिले नाही. महेंद्र गुर्जर हा मेरठमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. तेथून तो अमित आणि अनुज या मित्रांसह येथे आला. गावात मुक्काम करून संपूर्ण परिसराची रेक करून मित्रांसह घरात घुसून झोपलेल्या पत्नीला घेऊन गेले. यानंतर निर्जन भागात नेऊन त्याची हत्या केली आणि परत मेरठला गेले. हेही वाचा - धक्कादायक! 8 वर्षात 14 वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यांना महेंद्रवर संशय आला. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपी अनेक दिवसांपासून हत्येचा कट रचत होता. मात्र, त्याला यश मिळाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मेरठमध्ये तो त्याच्या मित्रांना भेटला आणि त्यांनी मिळून हत्येचा संपूर्ण कट रचला. त्यानंतर गावात येऊन त्यांनी हे कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
First published:

Tags: Murder Mystery, Rajasthan

पुढील बातम्या