रांची 14 जून : एका परिसरात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मागील दहा दिवसात या चोरांनी 12 हून अधिक घरांवर डल्ला मारला आहे. अद्याप पोलिसांनी या चोरांना पकडण्यात यश आलेलं नाही. अखेर परिसरातील लोकांनी कंटाळून चोरांसाठी थेट आपल्या दरवाजावरच संदेश लिहिला आहे. घर मालकांनी घराबाहेर चोरांना माहिती देत लिहिलं आहे, की त्यांच्या घरी आधीच चोरी (Theft) झाली आहे. त्यामुळे, फुकटात कष्ट घेऊ नयेत. चोरांच्या दहशतीमुळे आपलं मौल्यवान सामानही सोडावं लागलेल्या या लोकांनी आता या प्रकाराला कंटाळून अखेरचा हाच पर्याय अवलंबला आहे. ही घटना झारखंडच्या रांचीमधील (Ranchi) पुनदाग ओपी (Pundag Area) क्षेत्रातील आहे.
लोकांचं असं म्हणणं आहे, की पुनदाग ओपी परिसरात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. हे चोर परिसरात सतत चोरी करत असल्याचं समोर येत आहे. या चोरांची दहशत इतकी आहे, की त्यांच्यामुळे लोक आपल्या घराबाहेर पोस्ट लावत आहेत. यावर लिहिलं जात आहे, की इथे आधीही चोरी झाली आहे. फुकटात कष्ट घेऊ नका. या चोरांमुळे केवळ घरमालकच नाही तर भाड्याने घरांमध्ये राहाणारे लोकही घर बंद करुन बाहेर जाण्यास घाबरत आहेत. रांचीच्या पुनदाग ओपी क्षेत्रातील भगवती नगरमध्ये एकसोबतच अनेक घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात लाखो रुपये आणि दागिन्यांसह किमती सामान चोरी झालं आहे.
मेश राशीच्या लोकांनी आईशी मतभेद टाळा, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य काय सांगतं?
पुनदाग ओपी परिसरात चोरांची दहशत इतकी आहे, की शनिवारी रात्री एकसोबतच अनेक घरांमध्ये चोरी झाली आहे. शिक्षण विभागात काम करणाऱ्या जितेंद्र सिंह यांच्या घरातून चोर कुलूप तोडून दागिन्यांसह किमती सामान घेऊन पसार झाले. त्यांच्याच्या घरी भाड्यानं राहाणाऱ्या मनोज अग्रवाल यांच्या घरीही चोरांनी डल्ला टाकला. यासोबतच शेजारीच राहाणाऱ्या संजीव कुमार खन्ना यांच्या घरीही चोरी केली.
बेरोजगार प्रीतम कसा झाला सुपरस्टार? पाहा सलमान खाननं केली होती अशी मदत
या परिसरात राहाणाऱ्या राहुल नावाच्या एका व्यक्तीनं सांगितलं, की चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र अद्याप पोलीस याप्रकरणात काहीही तपास लावू शकलेले नाहीत. त्यामुळे, आता थेट चोरांनाच विनंती करत आपल्या घराचं संरक्षण करण्याची वेळ लोकांवर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.