मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वेदनेने तडफडत होती चिमुकली; मदत करण्याऐवजी लोक अर्धा तास व्हिडिओ बनवत राहिले अन् तिने जग सोडलं

वेदनेने तडफडत होती चिमुकली; मदत करण्याऐवजी लोक अर्धा तास व्हिडिओ बनवत राहिले अन् तिने जग सोडलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

हल्ल्यानंतर ही चिमुकली जवळपास अर्धा तास तडफडत राहिली. इथे लोकांनी गर्दी केली. मात्र, तिला रुग्णालयात न नेता तिचा व्हिडिओ बनवत राहिले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 04 डिसेंबर : माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. यात आपल्या काकांसोबत बाजारात फिरण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षाच्या चिमुकलीची हत्या झाली. या घटनेचा एक नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की हल्ल्यानंतर ही चिमुकली जवळपास अर्धा तास तडफडत राहिली. इथे लोकांनी गर्दी केली. मात्र, तिला रुग्णालयात न नेता तिचा व्हिडिओ बनवत राहिले. लोक तिला विचारत राहिले, की हे सगळं कोणी केलं? यादरम्यानच मुलीने प्राण सोडले. ही घटना उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे घडली.

गेल्या तीन महिन्यांत पिलीभीत जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. सोबतच सामान्य जनताही या बाबतीत संवेदनशील दिसली नाही. असाच काहीसा प्रकार या प्रकरणातही घडला. हल्ल्यानंतर निष्पाप मुलगी वेदनेने त्रस्त होती आणि लोक व्हिडिओ बनवत होते. तिला दवाखान्यात नेण्याऐवजी हे कोणी केलं? असे प्रश्न लोक विचारत होते.

3 दिवसांपूर्वी बेपत्ता, घराच्या टाकीत मृतदेह; अश्विनीच्या गूढ मृत्यूने अमरावती हादरली!

तीन महिन्यांपूर्वीही पिलीभीत शहरात अशीच घटना घडली होती. त्यात इब्राहिम नावाचा मुलगा रस्त्यात वेदनेने मरण पावला, पण लोक त्याचा व्हिडिओ बनवत राहिले. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याला वाचवण्याची तसदी कोणी घेतली नाही.

अमरिया पोलीस स्टेशन हद्दीतील माधौपूर गावातील रहिवासी 10 वर्षीय निष्पाप मुलगी अनम हिचा मृतदेह शनिवारी सकाळी शेतात रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. या प्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि लोक तिचा व्हिडिओ बनवत होते. जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची तसदी कोणी घेतली नाही. काही वेळाने निष्पापाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

'कोण नाय कोणचा' पॅटर्न, 15 वर्षांच्या पोराने केला शाळेबाहेर विद्यार्थ्यावर चाकू हल्ला, पडले 19 टाके

यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि एसएसपी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यासोबतच घटनास्थळी पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. मृत निष्पाप अनमचे काका सलीम यांनी आरोप केला आहे की, 10 वर्षीय अनम काल संध्याकाळी गावात आयोजित उर्ससाठी तिच्या काकासोबत गेली होती, ती घरी न परतल्याने शोध सुरू केला. यादरम्यान ही मुलगी शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder