मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पेणध्ये दरोडेखोराच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश, एटीएमवर धाडसी दरोड्याचा प्लॅन फसला

पेणध्ये दरोडेखोराच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश, एटीएमवर धाडसी दरोड्याचा प्लॅन फसला

पेण तालुक्यातील कामार्ली येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

    प्रमोद पाटील, रायगड, 22 सप्टेंबर : पेण पोलिसांनी एटीएममध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जेरबंद केलं आहे. खरंतर परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा हा धाडसी दरोड्याचा प्लॅन फसला. परिसरातील नागरिकांनी दरोडा टाकणाऱ्या आरोपीला पकडलं होतं. त्यानंतर पोलिसांना संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. पोलील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या हाती आरोपीला स्वाधीन केलं होतं. तर दुसरा आरोपी पोलिसांच्या हातून निसटून गेला. पेण तालुक्यातील कामार्ली येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. या दरोड्यात दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. यामधील एका दरोडेखोराला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर दुसरा दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला असल्याचे समोर आले आहे. पेण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तडवी हे करत आहेत. साताऱ्यात एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनचा स्फोट दरम्यान, काही दिवसांपूर्वी साताऱ्या एटीएम फोडीची घटना समोर आली होती. सातारा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणे गावात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकला होता. एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट करून उडवून दिले होते. एटीएममधून रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला होता.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या