पाटना, 10 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) लखनऊच्या बंथरा भागातील पिता-पूत्र एकत्र दारू प्यायला बसत होते. बुधवारी रात्रीही रात्री उशिरा दोघे एकत्र बसून दारू पित होते. त्या दिवशी दोघांमध्ये भांडण झालं. हे भांडण मारहाणीपर्यंत गेलं. यादरम्यान वडिलांनी मुलाच्या डोक्यावर विटेने हल्ला (Crime News) केला. ज्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान दोघांमधील वाद ऐकून पत्नी तेथे पोहोचली. मात्र पत्नीला धक्का मारून आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतांमध्ये दारूच्या नशेत नेहमी वाद होत होता. पोलिसांनीही अनेकदा त्यांना समजावलं होतं. मृत व्यक्तीच्या पत्नीने आरोपी सासऱ्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
उम्मेदखेड़ा गावचे निवासी कृष्ण कुमार सिंह उर्फ कालीने बुधवारी रात्री उशिरा मुलगा शुभम (35) याच्या डोक्यावर विटेने मारून हत्या केली. शुभमची पत्नी अनामिका सिंहने सासरे कृष्ण कुमारविरोधात हत्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितलं की, पिता-पूत्रांमध्ये नशेच्या अवस्थेत वारंवार वाद होत होता. ज्यात स्थानिक लोक मध्यस्थी करून वाद सोडवित होते. अनेकदा या प्रकरणात पोलिसांनाही बोलवण्यात आलं होतं. अद्याप आरोपीचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा-60 वर्षीय व्यक्ती चिमुरडीला एकीकडे नेत करीत होता छेडछाड; अखेर पोलिसांनी....
5 वर्षांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन केलं होतं लव्ह मॅरेज...
पोलिसांनी सांगितलं की, शुभमने पाच वर्षांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन अनामिका उर्फ प्रिन्सीसोबत लग्न केलं होतं. शुभम बेरोजगार असल्यामुळे काही दिवसांनंतर घरात वाद सुरू झाला होता. पिता पुत्रांमध्ये दारूच्या नशेत महिन्याचा घरखर्चाबाबत नेहमी वाद आणि मारहाण होत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Uttar pradesh news