'वहिनी तू सुंदर आहेस', घरफोडी करून चोरांनी लिपस्टिकनं लिहिला मेसेज

धक्कादायक! व्यापाऱ्याच्या घरावर चोरांचा दरोडा, लिपस्टिकने वहिनी-भावाबद्दल लिहिले अपशब्द.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 01:17 PM IST

'वहिनी तू सुंदर आहेस', घरफोडी करून चोरांनी लिपस्टिकनं लिहिला मेसेज

पाटना, 05 नोव्हेंबर: छटपूजेसाठी आपलं घर बंद ठेवून गावी जाणं एका व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. चोरांनी घरफोडी करून घरातील 60 लाख रुपयांसह दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जाताना वहिनी आणि भावाबद्दल आरश्यावर अपशब्द लिहून चोर पसार झाले आहेत. पटना इथल्या पत्रकार नगर परिसरात हा प्रकार घडला. हनुमान नगर इथे राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरात चोरांनी हात साफ करत 60 लाख रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि महागड्या वस्तू लंपास केल्या आहेत. घरफोडून चोर आत आले आणि त्यांनी घरातील कपडे वगळता सगळं सामान लंपास केलं आहे. ब्रश आणि टुटपेस्टही चोरांनी सोडली नाही. जाताना चोरांनी ड्रेसिंग टेबलवर असलेल्या आरश्यावर लिपस्टिकने धक्कादायक मचकूर लिहिला. 'वहिनी तू खूप सुंदर आहेस, वहिनी तुझे मनापासून आभार, देव तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करो.' इतकच नाही तर दादाबद्दल अपशब्दही लिहिल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर भरदिवसा गोळीबार, घटनेचा VIDEO VIRAL

चोरांनी टेबलापासून ते बेडपर्यंत आणि कपाटापासून ते ड्रेसिंग टेबलपर्यंत उपयोगी असणाऱ्या, महागड्या वस्तू चोरल्या आहेत. त्यांनी सगळं घर अस्ताव्यस्त केलं कपाट रिकामं करुन कपडे घरभर पसरून ठेवले आणि सगळे कड्या कुलपं तोडली. पीडित परिवार घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार पाहून त्य़ांनी डोक्याला हात लावला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सगळं घर लुटलं होतं. दरम्यान हा सगळा प्रकार तात्काळ त्यांनी पोलिसांच्या कानावर घातला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आई-वडील वयोवृद्ध आहेत. ते गावी असतात. छटपूजेसाठी पीडित कुटुंबीय आपल्या आई-वडिलांकडे गावी गेले होते. त्यांचे काही नातेवाईक चोरी झालेल्या इमारतीच्या दुसऱ्या प्लॅटमध्ये राहात असल्याची माहिती त्यांनी दिली. भावाला त्यांच्याजवळ ठेवलं असल्याचा दावा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरी कोणी नसताना ही झालेली चोरी असल्यामुळे ह्या घटनेला घरफोडी नाही तर चोरी म्हणावं लागेल असं स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे.

Loading...

SPECIAL REPORT: तुमचं Whatsapp सिक्युअर आहे? तुमच्या आकाऊंटवर कुणाची नजर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 12:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...