मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अमरावतीमधील रुग्णालयातच मध्यरात्री रुग्णाची आत्महत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप

अमरावतीमधील रुग्णालयातच मध्यरात्री रुग्णाची आत्महत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या रुग्णाने रुग्णालयात चादरने गळफास घेत आत्महत्या केली. सध्या पोलीस या आत्महत्या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती 28 सप्टेंबर : अमरावतीच्या विभागीय सेवा संदर्भ रुग्णालय सुपर स्पेशालिटी येथे एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या रुग्णाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश बारकाजी माकोडे असं रुग्णालयात आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचं नाव आहे. रात्री दीड वाजता या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

17 महिने मृतदेह घरात असूनही दुर्गंधी कशी पसरली नाही? कानपुरमधील त्या घटनेचं संपूर्ण सत्य

डॉक्टरांनी रात्री योग्य उपचार न केल्याने आणि हलगर्जीपणा केल्याने रुग्णाने आत्महत्या केली असल्याचा गंभीर आरोप रुग्णाच्या नातेवाईकाचा केला आहे. या रुग्णाने रुग्णालयात चादरने गळफास घेत आत्महत्या केली. सध्या पोलीस या आत्महत्या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश माकोडे हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या मुत्राशयातून रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. याठिकाणी तपासणीनंतर त्यांना मंगळवारी रात्री उशिरा सुपर स्पेशालिटीमध्ये हलविण्यात आलं होतं.

भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली, नालासोपाऱ्यातील घटनेचा VIDEO

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रात्री रुग्णालयातील एमओ यांनी त्यांची तपासणी केली होती. काही वेळाने त्यांचा त्रास कमी झाला, त्यामुळे ते चालत फिरत होते. सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही होणार असल्याने रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वार्डात त्यांना रात्री दीडच्या सुमारास भरती करण्यात आलं. यानंतर रुग्णालयातील इतर रुग्णांना पाहण्यासाठी एमओ खाली गेले . यावेळी सुरेश माकोडे यांनी पहाटे बेडवरील चादर घेऊन रुग्णालयातील ग्रीलला आत्महत्या केली, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

First published:

Tags: Crime news, Suicide news