नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : स्वस्तात डॉलर कमावण्याच्या लालसेतून एका डॉक्टरांची (Patient cheated doctor for lakhs of rupees) फसवणूक झाल्यामुळे त्यांना जबर धक्का बसला आहे. एका रुग्णाने त्याच्याकडे डॉलर असून पैशांसाठी ते स्वस्तात विकण्याची गरज (Patient offers US dollars to doctors) असल्याचं सांगितलं. यावर अधिक पैसे कमावण्याच्या लालसेनं डॉक्टरांनी ते डॉलर विकत घेण्याची तयारी केली. मात्र अखेरच्या क्षणॉलर (Doctor was cheated) डॉक्टरांनी चांगलीच फसवणूक झाली.
अशी मिळाली ऑफर
दिल्लीतील गीता कॉलनी परिसरात डॉ. आलोक विश्वास हे स्वतःचं क्लिनिक चालवतात. मदनपूर खादर परिसरात ते कुटुंबासह राहतात आणि दिवसभर क्लिनिकमध्ये रुग्णांची सेवा करून चरितार्थ चालवतात. एक दिवस त्यांच्याकडे रविशंकर नावाचा एक रुग्ण उपचारांसाठी आला. डॉक्टरांशी स्वतःच्या आजाराविषयी बोलता बोलता त्याने सराईतपणे अमेरिकी डॉलरचा विषय काढला. उत्सुकता ताणली गेल्यामुळे डॉक्टरांनी याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली.
डॉक्टरांना दाखवले अमिष
आपल्या मित्राकडे अमेरिकी डॉलर असून आपल्याला पैशांची गरज असल्याचं त्यानं डॉक्टरांना सांगितलं. आपला मित्र अमेरिकी डॉलर आपल्याला द्यायला तयार आहे, मात्र आपण डॉलर घेऊन काय करणार, असा मुद्दा त्यांने मांडला. आपण ते सगळे डॉलर तुम्हाला दिले, तर तुम्ही त्याबदल्यात भारतीय रुपये देऊ शकाल काय, अशी विचारणाही त्याने केली. त्यावर स्वस्तात डॉलर मिळवण्याच्या लालसेने डॉक्टरांनी याला तयारी दाखवली.
अशी झाली फसवणूक
एका रात्री रविशंकरने डॉक्टरांना स्मशानभूमी परिसरात नोटा घेऊन बोलावले. डॉक्टर त्यांच्या एका मित्रासह तिथे गेले. रविशंकर त्याच्या मित्रासह तिथे आला. मित्राने अंधारातच बॅग उघडून दाखवली आणि आतमध्ये 20 डॉलरच्या 1260 नोटा असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी ती बॅग स्वतःकडे घेतली आणि स्वतःच्या हातातील पैशांची बॅग त्याच्याकडे दिली. त्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा बॅग उघडून पाहिलं, तेव्हा त्यात डॉलरऐवजी केवळ रद्दी भरल्याचं त्यांना दिसलं. मात्र तोपर्यंत रविशंकर आणि त्याचा मित्र या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
हे वाचा - Love Story चा भयावह शेवट! प्रेमाचा प्रत्येक क्षण प्रेयसीसाठी ठरला मरणयातना, अखेर
पोलिसांत तक्रार
डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.